गरोदरपणात त्वचेची घ्या ‘ही’ खास काळजी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील गरोदरपणाचा काळ हा सुंदर दिवसांपैकी एक असतो. या काळात महिलेच्या शरीरात, हार्मोन्समध्ये तसेच त्वचा, केस आणि स्वभावातही अनेक बदल होताना दिसत असतात. परंतु काही स्त्रियांना मात्र त्वचा आणि केसात कोणताही बदल जाणवत नाही.

काही महिला अशा असतात ज्यांना डोळ्यांभोवती वर्तुळं, पिग्मेंटेशन, ओठ, फुटणं, त्वचेवर चट्टे येणं, मुरूम, व्हेरीकोज व्हेन्स, अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून गाठी होणं, भेगा पडलेल्या टाचा, नखं आणि केसांची वाढ खुंटणं अशा अनेक समस्या उद्भवतात. काहींच्या ओटीपोटात आणि मांडी तसंच त्याच्या आसपास त्वचेवर खाज सुटते किंवा लाल रंगाचे पुरळ उठते. त्यामुळं या दिवसात गरोदर स्त्रियांनी स्वत:ची विशेष काळजी घेतली पाहिजे. ही काळजी कशी घ्यावी याचीच माहिती आपण आज घेणार आहोत.

‘अशी’ घ्या त्वचेची काळजी
1) घराबाहेर पडताना प्रत्येक वेळी सनस्क्रीनचा वापर करा. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करावा. कारण सुर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करणं आवश्यक आहे.

2) सॅलिसिलिक ॲसिड किंवा रेटीनोईड, आयसोट्रेटीनोईन आणि ओरल टेट्रासाईक्लीन असलेली उत्पादनं वापरू नका. कारण त्यामुळं बाळात जन्मदोष उद्भवू शकतो. कारण यामुळं बाळामध्ये जन्मदोष उद्भवू शकतात.

3) मेकअप आणि त्वचेसाठी वापरली जाणारी उत्पादने सुगंध विरहित असणं गरजेचं आहे.

4) झोपण्यापूर्वी रोज न चुकता आपला मेकअप काढणं आवश्यक आहे.

5) त्वचेला मॉईश्चराईज करा.

6) दिवसातून दोनदा कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या.

7) जास्त जोरात आपली त्वचा घासू नका. अंग पुसण्यासाठी स्वच्छ आणि मुलायम कपडा वापरा.

8) चेहऱ्यावर मुरूम झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी ओटीसी उत्पादने वापरता येऊ शकतात. परंतु त्यात टॉपिकल बेंझॉयल पेरोक्साईड, अझेलिक ॲसिड आणि ग्लाईकोलिक ॲसिड असल्याची खात्री करून घ्या. तसंच कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

9) शक्य तितका आराम करा आणि ताण घेऊ नका.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.