सरकारी हॉस्टेल मधील मुली ‘प्रेग्नंन्ट’, घरी गेल्यांनातर ‘गर्भवती’ झाल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंड येथील एका शाळेमधील मुली अचानक गरोदर राहिल्याने एकच खळबळ माजली आहे. याबाबत शाळेतील एका अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी अजिब कारण सांगितले आहे. ते म्हणतात मुली सुट्टीमध्ये ज्यावेळी घरी जातात तेव्हा घरून परत येताना गरोदर राहून येतात.

झारखंडमधील गढवा येथील कस्तुरबा विद्यालयातील मुली गरोदर राहण्याचे प्रमाण गेल्या महिनाभरापासून समोर येत आहे. याबाबत शिक्षक विभागाचे मुख्य सचिव एपी सिंह यांनी अजिब स्पष्टीकरण दिले आहे. ए.पी. सिंग यांचा असा स्पष्ट विश्वास आहे की निवासी शाळेचा परिसर पूर्णपणे सुरक्षित आहे पण मुली सुट्टीसाठी घरी जातात. अशा परिस्थितीत प्रशासन एखाद्याच्या गोपनीयतेत कसा हस्तक्षेप करू शकेल ? असा सवाल यावेळी उपस्थित केला गेला आहे.

अशात एका जबाबदार अधिकाऱ्याने केलेल्या वक्तव्याचा असा अर्थ निघतो की निवासी शाळेतील मुली सुट्टीसाठी घरी जातात आणि येताना गरोदर होऊन होस्टेलला येतात. मात्र या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –