भयानक……गर्भवती शेळीवर सामूहिक बलात्कार..!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

बातमी आहे नराधमांच्या विकृतपनाची….हरियाणातील मेवातमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल आठ विकृत लोकांनी एका गर्भवती शेळीवर सामूहिक बलात्कार केलाय. सर्वात गंभीर बाब म्हणजे या घटनेनंतर शेळी मृत्यूमुखी पडली आहे. या प्रकरणी शेळी मालकाने गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार झाले आहेत.

शेळीवर सामूहिक बलात्कर केल्याची घटना 25 जुलैच्या रात्री घडली. आत्तापर्यंत तीन जणांची अोळख पटली असून, इतर पाच आरोपींची अोळख पटलेली नाही. सावकर, हारून, व जाफर अशी अोळख पटलेल्या आरोपींची नावे आहेत. गर्भवती शेळीवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर असलू यांनी पोलिसांकडे गुन्हा नोंद केल्याची माहिती नागीना पोलीस स्टेशनचे प्रमुख राजबीर सिंग यांनी दिली.
[amazon_link asins=’B01HCSV3MQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b066b40d-92fa-11e8-80e3-61d6d0f17337′]
प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी गर्भवती शेळीची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलती आहे. पेटा इंडियाचे तत्काळ प्रतिसाद समन्वयक मीत अशर यांनी गर्भवती शेळीवर अत्याचार झाल्याचा दावा केला आहे.