प्रेग्नंट ‘बेबो’ करीनाचा ‘असा’ अवतार पाहून चकित झाले लोक ! म्हणाले – ‘फोटो पाहून घाबरलो’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार करीना कपूर (Kareena Kapoor) आणि पती अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरी आता नवा पाहुण येणार आहे. सैफ आणि करीना दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. लवकरच तैमूर अली खानला (Taimur Ali Khan) भावंड मिळणार आहे. करीना आपल्या अ‍ॅक्टींग सोबत फॅशन साठीही ओळखली जाते. अलीकडेच करीनानं एक सेल्फी शेअर केला होता. या फोटोची सध्या सोशलवर खूप चर्चा होताना दिसत आहे. हा फोटो अचानक पाहिल्यानंतर आम्ही एकदम घाबरलो अशी कमेंट काहींनी या फोटोवर केली आहे.

करीनानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती क्लोज सेल्फीमध्ये दिसत आहे. करीनानं डोळ्यात काजळ आणि ओठांवर पिंक लिपस्टिक लावली आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. तिचे हावभाव देखील पाहण्या सारखे आहेत.

करीनाचा हा फोटो समोर आल्यानंतर लोकांनी लाईक्स आणि कमेंट करायला सुरुवात केली. काहींना करीनाचा हा लुक खूप आवडला तर काहींना मात्र अचाकन हा लुक पाहून भीती वाटली आहे असंही काहींनी सांगितलं आहे.

चाहत्यांसोबत सेलिब्रिटींनी करीनाच्या या फोटोवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. सध्या करीनाचा हा फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे,.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला होता. लवकरच ती करण जोहरच्या तख्त या मल्टीस्टारर सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे. या सिनेमात ती आमिर खानसोबत काम करणार आहे. पुढील वर्षी ख्रिसमसला हा सिनेमा रिलीज होणार आहे.