गरोदर मातांनी ‘या’ 7 प्रकारे घ्यावी काळजी, ‘संसर्गजन्य आजार’ राहतील दूर

पोलीसनामा ऑनलाइन –  गरोदर मातांनी आपल्या आरोग्याची नेहमीच खुप काळजी घेणे गरजेचे असते. कारण संसर्गजन्य आजार त्यांच्यासाठी आणि पोटातील बाळासाठी समस्या निर्माण करू शकतात. सध्या तर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण खुपच वाढले आहे. संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी गरोदर मातांनी काय करावे, कोणती काळजी घ्यावी, हे आजार कशामुळे होतात, त्यांचे परिणाम याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

कशाद्वारे होतात ते आजार

1 संसर्ग थुंकीवाटे होऊ शकतो
2 घरातील पाळीव प्राण्यांद्वारे
3 हवेद्वारे होऊ शकतो
4 अन्नाद्वारे पसरू शकतो.
5 पाण्याद्वारे होऊ शकतो.

अशी घ्या काळजी

1 हातांच्या स्वच्छतेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. हात सतत धुवा. हाताला झालेली जखम उघडी ठेवू नका.
2 बाहेर जाताना मास्कचा वापर करा. खोकला, सर्दीची लक्षणे असतील तर मास्क किंवा रुमालाने तोंड झाकून ठेवा.
3 योग्य पद्धतीने शिजवलेले अन्न सेवन करा. भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून घ्या. अन्नपदार्थ सेवन करू नका.
4 शरीरात योग्य पाण्याची पातळी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या.
5 डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.
6 उघड्यावरचे, बाहेरचे अथवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा.
7 डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी लसीकरण करा.