International Women’s Day 2020 : खांद्यावर 20 किलोची बॅग, हातात AK-47, प्रेग्नन्ट कमांडरच्या धैर्याची कहानी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात आज म्हणजे 8 मार्चला अंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने अनेक धाडसी महिलांच्या प्रेरणादायी प्रवासाची खुप चर्चा होत आहे. जर कुणाला सांगितले की, एक गरोदर महिला एके 47 हातात घेऊन, सामानाने भरलेली सुमारे 15 से 20 किलोची बॅग खांद्यावर अडकवून नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी जंगलात जाते, तर यावर कुणीही सहज विश्वास ठेवणार नाही.

दंतेवाडामध्ये एक अशी डीआरजी दंतेश्वरी फायटर्सची धाडशी महिला कमांडो सुनैना पटेल आहे, जी महिला सशक्तीकरणाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. कामाचा एवढा उत्साह आहे की, नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी बिनधास्त आपल्या टीमसोबत जंगलात शिरते. गरोदर असूनही सुनैनाने हे काम थांबवले नाही, उलट गरोदरपणात ती जास्त काम करत आहे.

सुनैनाला मुलगी झाल्यास नाव ठेवणार दंतेश्वरी फायटर्स!
सुनैना पटेल जड ओझे खांद्यावर उचलून, नदी, नाले, जंगल, डोंगर, दरीमध्ये पायी अनेक किलोमीटर चालून नक्षली ऑपरेशनमध्ये अनेकदा सहभागी होत आली आहे. लोकांना जेव्हा सुनैनाच्या धाडसाबाबत समजले, तेव्हा सर्वजण तिचे कौतूक करू लागले आहेत. तिच्या सहकारी महिला कमांडोजने सांगितले की, सुनैनाला जर मुलगी झाली तर आम्ही तिचे नाव दंतेश्वरी फायटर्स ठेवणार.

सुनैनाने अधिकार्‍यांना का सांगितले नाही गरोदरपणाबाबत?
सुनैना म्हणाली, डीआरजी टीम गठित होण्यापूर्वी सुमारे एक महिन्यानंतर ती गरोदर राहिली. तिला नक्षली ऑपरेशनवर जायचे असल्याने, तिने अधिकार्‍यांना गरोदरपणा बाबत सांगितले नाही. जर अधिकार्‍यांना गरोदरपणा बाबत सांगितले असते तर त्यांनी तिला ऑपरेशनमध्ये सहभागी करू घेतले नसते. सुनैना म्हणाली, सुमारे साडेसहा महिन्यानंतर गरोदर असल्याचे तिने अधिकार्‍यांना सांगितले.

सुनैना म्हणाली, आजही जिथे पाठवतील तिथे जाण्यास मी तयार आहे. एसपी डॉ. अभिषेक पल्लव यांनी सुनैनाचे कौतूक करताना म्हटले की, ती या टीमची सर्वात धाडशी, ताकदवान महिला कमांडो आहे. काम करण्याचा तिच्यात उत्साह आहे. जेव्हा ती गरोदर असल्याचे समजले तेव्हा आरोग्याची काळजी म्हणून तिला ऑपरेशनवर पाठवणे बंद करण्यात आले आहे.

मे 2019 मध्ये महिला पोलीस कर्मचारी व सरेन्डर महिला नक्षलींना एकत्र करून महिला डीआरजी टीम तयार करण्यात आली होती. यामध्ये महिला पोलीस कर्मचारी सुनैना सुद्धा सहभागी होती. दंतेवाडा हा जिल्ह्यातील एकमेव भाग आहे, जिथे महिला डीआरजी टीमसुद्धा आहे, जी नक्षली ऑपरेशनसाठी जंगलांमध्ये जाते.