प्रेग्नंसीदरम्यान ‘कोरोना’, 2 आठवडे कोमात होती महिला, नंतर दिला जुळ्या मुलींना जन्म

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    एका महिलेच्या प्रेग्नंसीला जेव्हा 2 महिने आणि एक आठवडाच झाला होता, तेव्हा ती कोरोना व्हायरसने बाधित झाली. यानंतर महिलेची प्रकृती इतकी बिघडली की मेडिकली इंड्यूस्ड कोमात ठेवावे लागले.

महिला दोन आठवडे कोमात असताना डॉक्टरांना सुद्धा हे वाटत होते की, पोटात वाढत असलेल्या मुलांची वाचण्याची शक्यता खुप कमी आहे. परंतु हळुहळु महिलेची प्रकृती चांगली होऊ लागली आणि तिने जुळ्या निरोगी मुलींना जन्म दिला.

प्रेग्नंसीदरम्यान गंभीर कोरोनाशी लढा देण्याचे हे प्रकरण आयर्लंडमधील आहे. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, 32 वर्षांच्या डॅनिएल मार्टिनने मागच्या आठवड्यातच दोन मुलींना जन्म दिला.

डॅनिएल गंभीर आजारी असताना सुद्धा जुळ्या मुली निरोगी जन्माला आल्याने चमत्कार मानले जात आहे. विशेष म्हणजे, जेव्हा डॅनिएलला कोरोना झाला, तेव्हा तिला हेदेखील माहिती नव्हते की, तिच्या गर्भात जुळे आहेत.

श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर डॅनिएलला एप्रिलच्या सुरूवातीला कोरोनामुळे हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र, तिला अगोदर वाटत होते की, किरकोळ चेस्ट इन्फेक्शनमुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत आहे.