संताजपनक ! ‘आयसोलेशन’मध्ये ‘प्रेग्नंट’ महिलेवर 2 दिवस बलात्कार, जन्म घेण्यापुर्वीच आईसह बाळाचा मृत्यू

बिहार : वृत्तसंस्था – कोरोनामुळे संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. रस्त्यावर पोलिसांचा 24 तास फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. परंतु अशात देखील महिलांवरील अत्याचाराचे प्रकार समोर येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. असाच एक धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. कोरोनाग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेल्या कोरोना वॉर्डमध्ये एका गर्भवती महिलेवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला असून महिलेच्या कुटुंबीयांनी आरोग्य कर्मचाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, महिलेवर दोन दिवस बलात्कार करण्यात आला.

आसोलेशनमधून घरी आल्यानंतर दुसऱ्यादिवशी मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील गयाच्या अनुग्राह नारायण मगध मेडिकल कॉलेज व रुग्णालयात महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या ठिकाणच्या एका आरोग्य कर्मचाऱ्याने महिलेवर सलग दोन दिवस बलात्कार केल्याचा आरोप आहे. ज्यावेळी गरोदर महिला रुग्णालयातून बाहेर पडली आणि घरी पोहचली तेव्हा तिला तीव्र रक्तस्त्राव झाला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात महिलेच्या सासूने रोशनगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

महिला आयसोलेशनमध्ये होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला 25 मार्च रोजी लुधियानाहून आपल्या पतीसोबत आली होती. येथे आल्यानंतर त्यांना 27 मार्च रोजी मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केले. महिलेने दोन दिवस कोरोनाची चिन्हे दर्शवली त्यानंतर तिला विलगीकरण कक्षात हलवण्यात आले. या महिलेची कोरोना टेस्ट झाली होती आणि तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, मात्र दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला.

कर्मचाऱ्याने दोन दिवस केला बलात्कार
मृत महिलेच्या सासूने सांगितले की, रुग्णालयाच्या वॉर्डातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने दोन दिवस तिच्या सुनेवर बलात्कार केला. त्यामुळे तिच्या पोटातील बाळाला त्रास झाला आणि जास्त रक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. सासूच्या म्हणण्यानुसार, कोरोना वॉर्डमध्ये आलेल्या एका आरोग्य कर्मचाऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती सूनेने दिली होती. त्यांनी पुढे सांगितले की, माझी सून याबद्दल तक्रार करणार होती. तेव्हा रुग्णालयातील गेटमॅनने तिला बदनामीची भीती दाखवल्याने ती घाबरली आणि तिने तक्रार केली नाही. घरी आल्यानंतर तीने वारंवार आरोग्य कर्मचाऱ्याने तिच्यासोबत केलेल्या कृत्याचा उल्लेख करत होती. मृत महिलेच्या सासूने, बाळाच्या मृत्यूला आणि सुनेच्या मृत्यूला आरोग्य कर्मचारी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.