खळबळजनक ! बेबी फॅक्टरीचा पर्दाफाश, 19 महिला गर्भवती, बलात्कार पिडीतेंच्या जन्मलेल्या मुलांची विक्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांना बंदी बनवून त्यांच्यावर बलात्कार करून त्यातून जन्म झालेल्या मुलांची विक्री करणाऱ्या ‘बेबी फॅक्टरी’चा पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला आहे. नायजेरियातील लागोसा मधील हा प्रकार असून ८७ हजारांपर्यंत ह्या मुलांची विक्री केली जात असे आणि ६० हजारांमध्ये मुलींची विक्री केली जात असे.
Baby Factory
सोमवारी पोलिसांनी लागोसा येथील चार ईमारतींमध्ये छापे मारले. महिलांचे अपहरण करून या ठिकाणी महिलांना आणले जात होते आणि नंतर त्यांचे शोषण केले जात असे. तसेच या ठिकाणांहून बिना ट्रेनिंग काम करणाऱ्या दोन नर्सला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणांहून पोलिसांनी तब्बल एकोणीस प्रेग्नन्ट महिलांची सुटका केली आहे. त्याचबरोबर या फॅक्टरीतून चार मुलांना देखील वाचवण्यात आले आहे.
Baby Factory
लागोस हे नायजेरियातील सर्वात मोठे शहर आहे. या ठिकाणी वाचवण्यात आलेल्या मुलींमध्ये पंधरा ते अठ्ठावीस वयोगटातील मुली होत्या. ओलूची नावाच्या महिलेचा शोध सध्या पोलीस घेत आहेत कारण हे रॅकेट चालवण्यामध्ये या महिलेचा मोठा हात होता.
Baby Factory
या ठिकाणी सुदूर भागातील महिलांना तुम्हाला शहरात घरगुती काम मिळवून देतो असे सांगण्यात आले होते. या महिलांना कोणतीही रक्कम दिली गेली नव्हती. एका स्थानिक व्यक्तीने रस्त्यावर जेव्हा अनेक प्रेग्नन्ट महिलांना पाहिले त्यावेळी पोलिसांना या सर्व प्रकारची माहिती मिळाली.
Baby Factory

Visit : policenama.com