एकतर्फी प्रेमातून केला होता अ‍ॅसिड हल्ला ; प्रीती राठीच्या खुन्याची फाशी हायकोर्टाकडून रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नोकरीसाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या प्रीती राठी या तरुणीच्या अंगावर अ‍ॅसिड फेकून खून केल्याबद्दल अंकुर पवार या आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करुन जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. महिलांवरील अत्याचाराचे खटले चालविणाऱ्या विशेष सत्र न्यायालयाने अंकुरला ९ सप्टेंबर २०१६ रोजी फाशी सुनावली होती. जीवघेण्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या खटल्यात दिली गेलेली ती पहिलीच फाशी होती.

या निकालाविरुद्ध अंकुर पवार याने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे अंकुरचे अपील व फाशी कायम करण्याचे वैधानिक प्रकरण अशा दोन प्रकरणावर २६ मार्चपासून सुनावणी सुरु होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने फाशी कायम न करण्याचा निकाल दिला.

गुन्हे शाखेने सादर केलेले सर्व पुरावे ग्राह्य धरून प्रीतीचा खून अंकुरनेच केला हा सत्र न्यायालयाचा निष्कर्ष खंडपीठाने अपिलात कायम ठेवला. मात्र जिवघेणा अ‍ॅसिड हल्ला हा गुन्हा अमानुष असला तरी ज्यासाठी फक्त फाशी हिच शिक्षा अपरिहार्य ठरावी असा तो ‘विरळात विरळा’ नाही, असे खंडपीठाने म्हटले.

प्रीती व अंकुर हे दोघेही दिल्लीतील नरेला भागात शेजारी राहायचे. अंकुरचे प्रीतीवर एकतर्फी प्रेम होते, पण तिने त्याचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. याचा सूड उगविण्यासाठीच अंकुरने प्रीतीवर अ‍ॅसिड हल्ला केला हे अभियोग पक्षाचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले. आपल्याला या खटल्यात निष्कारण गोवण्यात आले, आधी पोलिसांनी रोहतक येथील एका तरुणाला अटक केली होती, पण ओळखपरेड न घेताच त्याला सोडून देण्यात आले, पोलिसांनी अ‍ॅसिड दिल्लीतूनच खरेदी केल्याचे कथित पुरावे पश्चातबुद्धीने नंतर गोळा केले यासह अंकुरने बचावासाठी मांडलेले मुद्दे अमान्य केले गेले.

प्रीतीला मुंबईत भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस अश्विनी’ इस्पितळात परिचारिका म्हणून नोकरी लागली होती. तेथे रुजू होण्यासाठी ती वडील, चुलते व आत्यासह गरीबरथ एक्स्प्रेसने दिल्लीहून आली. २ मे २०१३ रोजी ती वांद्रे टर्मिनसवर उतरली. अंकुर तिच्या पाळतीवरच होता व त्याच गाडीतून तोही दिल्लीहून आला होता. वांद्रे टर्मिनसला पोहोचताच गर्दीचा फायदा घेत तो तोंडावर बुरखा घालून प्रीतीच्या जवळ आला व त्याने बाटलीतील सल्फ्युरिक अ‍ॅसिड तिच्यावर फेकले. भीषण स्वरूपात भाजलेल्या प्रीतीचा नंतर एक महिन्याने १ जून रोजी मृत्यू झाला होता.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like