Coronavirus : ‘कोरोना’मुळं ‘या’ मालिकेतील प्रमुख दोन कलाकारांनी सोडली मालिका

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं सारं काही ठप्प झालं आहे. सिनेमांची आणि टीव्ही मालिकांची शुटींगही गेल्या अनेक दिवसांपासून बंदच होती. हळूहळू सारं काही अनलॉक होत आहे. पुन्हा एकदा शुटींगला सुरुवात होत आहे. असं असलं तरी कोरोनाचं संकंट अद्यापही कमी झालेलं नाही हेही खरं आहे. अशात कोरोनामुळं एका मालिकेलतील दोन कलाकारांनी मालिकाचं सोडली आहे.

आम्ही ज्या मालिकेबद्दल सांगत आहोत त्या मालिकेचं नाव प्रेम पॉयजन पंगा आहे. झी युवावर ही मालिका प्रसारीत होत असते. या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या दोघांनी ही मालिका सोडली आहे. मालिकेत मालतीची भूमिका साकारणाऱ्या इरावीत लागू आणि कैलास भोळेची भूमिका साकारणाऱ्या स्वप्नील राजशेखर यांनी ही मालिका सोडली आहे. आता हे दोन्ही कलाकार यापुढे मालिकेत दिसणार नाहीत.

त्यांनी असं का केलं आहे हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. आपल्यामुळं आपल्या मालिकेतील लोकांना त्रास नको म्हणून त्यंनी हा निर्णय घेतला आहे. मालिकेचे निर्माते महेश कोठारे आदिनाथ कोठारे यांनाही त्यांनी आपला निर्णय कळवला आहे.

झी युवा वाहिनीवरील मालिकांचे नवीन एपिसोड 13 जुलै पासूनच प्रसारीत होत आहेत. पंरतु प्रेक्षकांना या मालिकेत हे दोन्ही कलाकार दिसले नाहीत. हे दोन्ही कलाकार ज्या भागात राहतात ते भाग कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले होते. शुटींग सुरू झाली तेव्हा या भागातून बाहेर पडत शुटींगला जाणं त्यांना योग्य वाटलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच त्यांच्या आणि टीमच्या हितासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like