‘या’ 5 सवयींमुळे वेळेपूर्वीच येते वृद्धत्व, रहा सावध !

पोलिसनामा ऑनलाईन – आपल्या लाइफस्टाइलचा आपल्या आरोग्यावर खुप परिणाम होतो. डेली रूटीनच्या काही सवयी अशा असतात ज्यांच्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे वेळेपूर्वीच दिसू लागतात. कोणत्या चुकीच्या सवयीमुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते याबाबत आपण जाणून घेणार आहोत…

या सवयी टाळा

1 स्ट्रॉने पिणे –
कोणतेही पेय स्ट्रॉने पिताना ओठांच्या चारी बाजू ताणल्या जातात. यामुळे चेहर्‍यावर प्रीमॅच्युअर लाईन्स आणि सुरकुत्या पडू लागतात. यासाठी ग्लासाने पेय प्या.

2 जंक फूड आणि कोल्ड ड्रिंक –
जंक फूडमध्ये भरपूर ट्रान्स फॅट, मीठ आणि साखर असते. यामध्ये पोषकतत्व नाहीच्या बरोबर असतात. हे शरीरातील कोलेजनची मात्रा कमी करते. कोलेजन चेहर्‍यावरील सुरकुत्यांना रोखते. सोडा आणि कोल्ड ड्रिंक सुद्धा चेहर्‍यावर फाईन लाइन्स वाढवते.

3 दारूचे सेवन –
काही स्टडीजनुसार, जे लोक दारूचे सेवन करतात त्यांच्यात वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसतात. डोळ्यांखाली काळे डाग दिसतात, चेहर्‍यावर सुरकुत्या आणि डिहायड्रेशन होऊ लागते.

4 पोटावर झोपणे –
पोटावर उपडे झोपल्याने वृद्धत्वाची लक्षणे लवकर येतात. अस्थेटिक सर्जरी जर्नलमध्ये प्रसिद्ध स्टडीनुसार पोटावर उपडे झोपल्याने चेहर्‍यावर थेट दबाव पडतो. यामुळे सुरकुत्या येतात.

5 पूर्ण झोप न घेणे –
युनिव्हर्सिटी हॉस्पिटल केस मेडिकल सेंटरच्या स्टडीनुसार पूर्ण झोप न घेतल्याने चेहर्‍यावर सुरकुत्या येऊ लागतात. याचे प्रमुख कारण तणाव असते.