वेळेपूर्वीच जन्मलेल्या बाळांची चांगल्या प्रकारे देखभाल कशी कराल, जाणून घ्या ‘या’ 8 सोप्या पद्धती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   वेळेपूर्वी जन्मलेल्या मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. ही बाळं आपल्या शरीराचे तापमान कायम ठेवू शकत नाही. त्याच्या त्वचेखाली चरबीचा थर नसतो. यासाठी त्यांना थंडीत आणि गरमीत जास्त तापमानापासून दूर ठेवावे लागते. अशा बाळांना जन्मानंतर काही काळ इनक्यूबेटरमध्ये ठेवले जाते. डॉक्टरांनी इनक्यूबेटरमध्ये न ठेवण्याचा सल्ला दिला तरी अशा बाळांची काळजी घ्यावीच लागते. जन्मानंतर ताबडतोब अशा बाळांना कोरड्या चादरवर ठेवावे.

अशी घ्या काळजी

1 बाळाला कपडे घाला. एक तासाच्या आत आईने दूध पाजावे.

2 नंतर प्रत्येक दोन तासाने स्तनपान द्यावे.

3 वेळोवळी बाळाची डॉक्टरांकडून तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा.

4 काही व्हिटॅमिन आणि मिनरल 6-8 आठवड्यापर्यंत आवश्यक असतात. बाळाला ते योग्यप्रकारे दिल्यास त्याचे वजन सामान्य होते.

5 कॅल्शियमच्या कमतरतेने बालकांना झटके बसू शकतात. यासाठी आईचे दूध जरूरी आहे.

6 अशा बाळांना श्वासाचा त्रास असू शकतो. असा त्रास होत असेल तर ताबडतोब दवाखान्यात न्या.

7 आईने आपले हात नेहमी स्वच्छ ठेवावे. बाळाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.

8 संसर्गाचा धोका टाळण्यासाठी इम्यून सिस्टम मजबूत होण्यासाठी बाळाला स्तनपान द्यावे. दूध म्हणजे त्याच्यासाठी पहिली वॅक्सीन असते.

You might also like