Premature White Hair | 25 ते 30 च्या वयात केस होऊ लागले असतील पांढरे तर डेली डाएटमध्ये सहभागी करा ‘हे’ Vitamin Rich Foods

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Premature White Hair | कमी वयात केस पांढरे होणे हे तणावाचे कारण बनते. यासाठी डाय करणे हा तात्पुरता उपाय आहे. पांढर्‍या केसांवर मुळापासून उपचार करणे आवश्यक आहे, तरच या समस्येवर उपाय निघेल. लहान वयातच पांढरे केस होण्या मागची खरी कारणे आपण जाणून घेतली पाहिजेत. (Premature White Hair)

 

कमी वयात केस पांढरे का होतात? (Why does hair turn white at a young age)

जर काळे केस 25 ते 30 च्या वयात पांढरे होत असतील तर त्यामागे अनुवांशिक कारण असू शकतात.

अनेक वेळा ऑटो इम्यून सिस्टममधील समस्यांमुळे केस पांढरे होतात.

थायरॉईड विकार किंवा व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे काही लोकांचे केस लवकर पांढरे होतात.

स्त्रियांमध्ये लवकर रजोनिवृत्ती (Early Menopause) मुळे किंवा अति धूम्रपाना (Smoking) मुळेही ही समस्या होते.

सध्याच्या काळातील अनहेल्दी लाईफस्टाईल आणि खाण्याच्या सवयी हे देखील डोक्यावरील केस पांढरे होण्याचे कारण आहे. (Premature White Hair)

 

काळ्या केसांसाठी खा हे पदार्थ (Eat these foods for dark hair)
लहान वयातच केस पांढरे होण्याची समस्या थांबवायची असेल तर जीवनसत्त्वे घ्यावीत. यासाठी स्ट्रॉबेरी, किवी, अननस, टरबूज, बटाटा, शिमला मिरची, वनस्पती तेल, सोयाबीन, कडधान्य, अंडी, तांदूळ, दूध, मासे, चिकन, रेडमीट खा. यामुळे केस काळे तर राहतीलच शिवाय ते निरोगी आणि मजबूतही होतील.

 

केसांसाठी आवश्यक जीवनसत्त्वे (Vitamins are essential for hair)
केसांचे आरोग्य सुधारण्यात व्हिटॅमिनची भूमिका महत्त्वाची असते. जीवनसत्त्वापासून सीबम (Sebum) तयार करणे सोपे होते. हा एक तेलकट पदार्थ आहे जो त्वचेखाली आढळतो.

 

Vitamin B6 आणि B12 केसांना निरोगी आणि रेशमी बनवते, तसेच पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी हे अँटी-ऑक्सिडंट आहे जे केसांसाठी चांगले आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Premature White Hair | premature white hair at 25 to 30 years age group problems solution eat vitamin rich foods

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepak Kesarkar | शिवसेना प्रत्येकवेळी शरद पवारांमुळे फुटली, दीपक केसरकर यांचा गंभीर आरोप

 

Fasting and Diabetes | डायबिटीजचे रूग्ण उपवास करत असतील तर ‘या’ 5 गोष्टी आवश्य ठेवा लक्षात, ब्लड शुगर राहील कंट्रोल

 

Pune Rain | पुण्यात अतिवृष्टीचा इशारा ! पुण्यातील सर्व शाळांना एक दिवस सुट्टी जाहीर