Premature Wrinkles | ‘या’ चुकांमुळे पडतात चेहऱ्यावर सुरकुत्या, जाणून घ्या कारण आणि त्यावर घरगुती उपाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Premature Wrinkles | काही वर्षांपूर्वीपर्यंत सुरकुत्या आणि फाईन लाईन्स (fine lines) हे वृद्धावस्थाची ओळख होते. पण बदलत्या जीवनशैलीत ३० ते ३५ वयोगटातील लोकांनाही सुरकुत्या (Wrinkles) पडण्याची समस्या होऊ लागली आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू शकतात आणि यामध्ये मुख्य कारण म्हणजे तुमच्या काही सवयी, ज्यावर अनेकदा आपण लक्ष देत नाही किंवा टाळा-टाळ करत असतो. तर आज आपण अशाच काही सवयींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कमी वयात सुरकुत्या आणि फाईन लाईन्स येऊ शकतात. (Premature Wrinkles)

 

पोटावर झोपणे
पोटावर झोपल्यामुळे डोक्याचा संपूर्ण भार चेहऱ्यावर पडतो, ज्यामुळे हळूहळू स्लीपिंग मार्क्स (sleeping marks) दिसू लागतात, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. त्यामुळे सर्वात आधी तुमची ही सवय बदला तसेच उशीचे आवरणही बदला . सुती किंवा सिल्कचे उशीचे कव्हर वापरणे त्वचेसाठी कधीही चांगले.

 

खराब लाईफस्टाईल
आजकाल आपल्या पैकी बरेच जन स्मोकिंग (smoking) करतात आणि अल्कोहोल (alcohol) घेतात. यामुळे शरीरात व्हिटॅमिन ए (vitamin A) ची कमतरता भासू लागते. व्हिटॅमिन ए चेहऱ्यावरील पेशींना कोल्याजन (collagen) बनवण्यात मदत करते. कोलेजन हे एक प्रोटीन आहे जे आपल्या त्वचेला तरूण (Youthful skin) आणि ताजे दिसण्यात मदत करते. चेहऱ्यासाठी व्हिटॅमिन ए खूप महत्त्वाचा असतो. त्यामूळे तुम्ही अल्कोहोल आणि स्मोकिंग कमी करा. तसेच जर तुम्ही जंक फूडचे सेवनही खूप करत असाल तर ते लगेच बंद करणे त्वचेसाठी चांगले ठरेल. (Premature Wrinkles)

डोळे चोळणे
डोळ्यांच्या आजूबाजूचा भाग खूप मऊ असतो आणि जेव्हा तुम्ही सारखा डोळे चोळता तेव्हा येथील जागा सैल होते ज्यामुळे सुरकुत्या दिसू लागतात.

 

अँटी – एजिंग प्रोडक्ट्स
आपल्या पैकी बऱ्याच स्त्रिया अँटी – एजिंग प्रोडक्ट्स (Anti-ageing products) चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाही तोपर्यंत वापरत नाहीत. पण इतक्या उशिरा हे प्रोडक्ट्स वापरून तुम्हाला हवा असलेला रिझल्ट मिळत नाही. 30 वर्षापासूनच जर तुम्ही अँटी – एजिंग प्रोडक्ट्स वापरणे सुरू केले तर नक्कीच तुम्हाला लवकर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स येणार नाहीत.

 

पण जर तुम्हाला आत्ता सुरकुत्या असतील तर काही घरगुती आणि अगदी सोप्या पद्धतींनी तुम्ही या सुरकुत्या पूर्णपणे नाहीशा करू शकता.
रात्री चेहऱ्यावर खोबरेल तेल लावून झोपावे आणि सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा. असे नियमित केल्याने सुरकुत्या कमी होऊ लागतात.
याशिवाय खोबरेल तेलात मध मिसळून चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा आणि थोडा वेळ ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवा.
दहीमध्ये उडीत डाळ पेस्ट मिसळून चेहऱ्यावर लावल्याने सुद्धा सुरकुत्या कमी होतात.

 

Web Title :- Premature Wrinkles | due to these bad habits of yours premature wrinkles occur on the face

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Titan Smart Glasses | टायटनने लॉन्च केली ‘स्मार्ट ग्लासेस’ ! सेल्फी घेईल, कॉल देखील ऐकू शकतो आणि गाणे सुद्धा; जाणून घ्या किंमत अन् वैशिष्टे

 

Pune Crime | नायलॉन मांजाची विक्री करणारे व्यापारी जुनेद कोल्हापुरवाला व अदनान सय्यद यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

 

Pimpri Corona Updates | रुग्णसंख्येत मोठी वाढ ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2200 पेक्षा अधिक नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी