मुंबई : वृत्तसंस्था
दुचाकी नवीन घेणा-यांना मोटारसायकलच्या किमतीच्या १० टक्के विम्याचे पैसे भरावे लागतात. त्याच प्रमाणे आता नवीन चारचाकी गाडी घेणा-यांनाही विम्यासाठी ठरावीक रकमेच्या दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.कोर्टाने नुकतेच या संदर्भात दोन निर्णय दिले असून त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने आधीच मेटाकुटीस आलेल्या वाहन धारकांना चिंतेत टाकणारी ही गोष्ट आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’94f1867c-cd59-11e8-8ba2-2568c94a15d7′]
कोर्टाच्या निर्णयानुसार, थर्ड पार्टी इन्शूरन्स विमा बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच गाडी चालकांसाठी १५ लाखांचा वैयक्तिक अपघात विमा हा सुद्धा बंधनकारक करण्यात आला आहे. कोर्टाच्या या दोन निर्णयामुळे वाहनधारकांना आधीच्या तुलनेत जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
दुचाकी गाडी खरेदी केली तर त्याला पाच वर्षांसाठी थर्ड पार्टी इन्शूरन्स कव्हर खरेदी करणे बंधनकारक आहे. तसेच त्याला वार्षिक वैयक्तिक अपघात विमा सुद्धा घेणे बंधनकारक आहे. या दोन कारणांमुळे दुचाकीच्या इन्शूरन्स प्रीमियरसाठी १० टक्के रक्कम भरावी लागत आहे.
[amazon_link asins=’B06W2L794N,B06ZZ7NBNS,B071CMY25X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a6d4feaa-cd59-11e8-97c8-b5d0e0e0e693′]
कार खरेदी केल्यास थर्ड पार्टीला इन्शूरन्स घेणे बंधनकारक आहे. तसेच वैयक्तिक अपघात विम्यासाठी ७५० रुपये जास्तीचे खर्च करावे लागणार आहेत. सप्टेंबर आधी कार खरेदी केल्यानंतर १० हजार रुपये खर्च यायचा आता तो २० हजारांपर्यंत पोहोचला आहे.
उदा. जर १५० सीसीची एखादी बाइक ७५ हजार रुपयांना खरेदी केली तर ७६०० रुपये इन्शुरन्ससाठी मोजावे लागणार आहेत. तसेच तुम्ही वाहन खरेदी केले, तरीही थर्ड पार्टी इन्शुरन्स घ्यावा लागणार आहे. तसेच वाहनचालकाला ३ वर्षांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स सक्तीचा करण्यात आला आहे. त्याशिवाय अपघात विम्यासाठी तुम्हाला अतिरिक्त ७५० रुपये मोजावे लागणार आहेत. १००० सीसीच्या जास्त क्षमतेच्या गाड्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला इन्शुरन्ससाठी जवळपास २० हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.
थर्ड पार्टी इन्शुरन्स ?
मोटार वाहन कायद्यानुसार थर्ड पार्टी इन्शुरन्स कायदेशीर आहे. हा विमा तिसऱ्या पक्षाशी संबंधित आहे. पहिला पक्ष म्हणजे विमा विकत घेणारा, दुसरा पक्ष विमा कंपनी आणि तिसरा म्हणजे आपल्यामुळे ज्याच्या गाडीचे नुकसान झाले आहे असा व्यक्ती. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये या तिसऱ्या व्यक्तीलाच नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते. यामध्ये विमा घेणाऱ्या व्यक्तीला काहीही नुकसान भरपाई मिळत नाही. तसेच तिसऱ्या पक्षाचा मृत्यू किंवा गंभार दुखापत झाल्यास त्याला भरपाई देण्याचीही कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.