Jio चा 598 आणि 599 रुपयांचा प्लान, दोन्ही प्लॅनमध्ये मिळतात वेगवेगळे फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील सर्वात मोठे मोबाईल नेटवर्क ( Mobile Network) असलेलं जिओ नेटवर्क ( Jio Network) आपल्या ग्राहकांसाठी विविध प्लॅन ( Plan) आणत असते. पोस्टपेड आणि प्रीपेड अशा दोन्ही ग्राहकांसाठी कंपनीने जवळपास एकाच किंमतीत असलेले रिलायन्स जिओचे दोन प्रीपेड रिचार्ज प्लान ( Pripaid Recharge Plan) संबंधी माहिती देत आहोत. रोज २ जीबी डेटा (Data) ऑफर मिळणाऱ्या या प्लानमध्ये ५९८ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना काय काय मिळणार आहे याची आज आपण माहिती घेणार आहोत.

५९८ रुपयांचा प्लान
जीओच्या या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला ५६ दिवसांची वैधता मिळणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच ५६ दिवसांत एकूण ११२ जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा मिळतो.या प्लानमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड आणि नॉन जिओ नेटवर्कवर २ हजार एफयूपी मिनिट्स मिळतात. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळते. याशिवाय, जिओ ॲप्सचे सब्सक्रिप्शन या पॅकमध्ये फ्री मिळते. त्याचबरोबर या प्लानमध्ये कोणतेही अतिरिक्त शूल्क न देता एक वर्षापर्यंत डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे.

५९९ रुपयांचा प्लान
जीओच्या या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच ८४ दिवसांत एकूण १६८ जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा मिळतो.या प्लानमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड आणि नॉन जिओ नेटवर्कवर ३ हजार मिनिट्स मिळतात. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळते. याशिवाय, जिओ ॲप्सचे सब्सक्रिप्शन या पॅकमध्ये फ्री मिळते.