प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत पुन्हा होऊ शकते ‘वाढ’, जाणून घ्या किती टक्क्यांनी वाढणार ‘दर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतातील सर्व प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅनच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली. ज्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यात आता पुन्हा सर्व कंपन्या आपला एक महिन्यांचा प्रीपेड प्लॅन पुन्हा वाढवणार असल्याचे समजत आहे. दरम्यान, सध्या एका महिन्याच्या योजनेत वापरकर्ते पूर्वीपेक्षा 45 टक्के अधिक पैसे खर्च करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) रिलायन्स जिओला सांगितले होते की, 31 डिसेंबर 2020 पूर्वी किमान किंमत वाढवता येणार नाही. रिलायन्स कंपनीने आपला इंटरकनेक्ट चार्ज (आययूसी) यापूर्वीच लागू केला आहे. ट्रायने म्हटले आहे की 31 डिसेंबर 2020 नंतर किमान किंमत बदलली जाऊ शकते. दरम्यान, ट्रायने जिओच्या बाजूने निर्णय घेतला नाही.

जिओ वगळता भारतातील सर्व टेलिकॉम कंपन्या आर्थिक संकटातून जात आहेत. हे पाहता या कंपन्या आपला एक महिन्यांचा टॅरिफ प्रीपेड प्लॅन लवकरच वाढवू शकतात. कंपन्यांना त्यांच्या योजनांमध्ये वाढ करून त्यांचे उत्पन्न वाढवायचे आहे. डेटा प्लॅन वाढीच्या बाबतीत, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की 28 दिवसाची योजना वापरणार्‍या लोकांकडे फारच कमी पर्याय आहेत कारण गेल्या महिन्यात 28-दिवसाची योजना 15 टक्क्यांनी वाढली होती. त्यानंतर या योजनांच्या किंमती 148 रुपयांवर आल्या. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की टेलिकॉम कंपन्यांनी 28 दिवसांच्या योजनेत आपल्या ग्राहकांना अधिक डेटा द्यावा.

अहवालानुसार वर्ष 2020 नंतर 28 दिवसांच्या शुल्काच्या योजनांमध्ये 30 टक्के वाढ केली जाऊ शकते. यानंतर, सर्व टेलिकॉम कंपन्यांची डेटा किंमत जिओच्या आगमनापूर्वी जितकी होती तितकीच असेल.