हे’ आहेत 100 रूपयांपेक्षा कमी किंमतीचे एकदम ‘बेस्ट’ प्रीपेड प्लान, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – टॅरिफ डिसेंबर 2019 मध्ये महाग झाल्यानंतर दोन कंपन्यांमध्ये मोठे बदल झाले आहे. या दोन कंपन्या म्हणजे एअरटेल आणि व्होडाफोन. कंपन्यांना काही दिवसांपासून बरेच नुकसान झाल्यामुळे त्यांना प्रीपेड प्लान महाग करावा लागला असल्याचे कंपन्यांनी म्हंटले आहे. परंतू, काही कंपन्या टॅरिफ महाग झाल्यानंतर 100 रुपयांमध्ये कमी किंमतीचे काही प्लान ऑफर करत आहे. यामध्ये कॉलिंग, डेटा बेनिफिट दिला जाणार आहे.

फक्त 100 रुपयांमध्ये एअरटेलचे कमी किमतीचे प्लान खालीलप्रमाणे :

19 रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे. दोन दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये एकूण 200 एमबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये फ्री एसएमएस दिला जात नाही.

49 रुपयांचा प्लान
एअरटेलचा हा स्मार्ट रिचार्जची वैधता 28 दिवसांची आहे. 100 एमबी डेटा युजर्संना दिला जातो. प्लानच्या रिचार्जनुसार 38.52 रुपयांच्या टॉकटाईम दिला जातो.

79 रुपयांचा प्लान
एअरटेलच्या या स्मार्ट रिचार्जवर युजर्संना 64 रुपयांचा टॉकटाईम मिळतो. 200 एमबी डेटासह या प्लानची वैधता 28 दिवस इतकी आहे. या प्लानमध्ये प्रत्येक मिनिटाला 60 पैसे दराने चार्ज केला जातो.

व्होडाफोनचे कमी किमतीचे प्लान खालीलप्रमाणे :

19 रुपयांचा प्लान
व्होडाफोनच्या या प्लानची वैधचा 2 दिवसांची आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 200 एमबी डेटा दिला जातो. या प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये व्होडाफोन प्ले आमि 5 जीचे सब्सक्रिप्सन दिले जाते.

69 रुपयांचा प्लान
हा प्लान जिओ फोन युजर्संसाठी आहे. यामध्ये 25 फ्रि एसएमएस आणि 7 जीबी ऑफर मिळणाऱ्या या प्लानची वैधता 14 दिवस इतकी आहे. प्लानमध्ये जिओ नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. तर दुसरीकडे नेटवर्क्सवर कॉल करण्यासाठी यामध्ये 250 मिनिट्स मिळणार आहे. या प्लानमध्ये जिओ अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

75 रुपयांचा प्लान
कंपनीचा हा प्लान केवळ जिओ फोन युजर्ससाठी आहे. या प्लानची वैधता 28 दिवस आहे. या प्लानमध्ये एकूण 3 जीबी डेटा मिळतो. 50 फ्री एसएमएस दिले जातात. या प्लानमध्ये जिओ नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड आणि नॉन जिओ नेटवर्क्ससाठी 500 मिनिट्स दिले जातात. प्लानसोबत जिओ अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.