पुण्यातील मानाच्या गणपतींची 1 वाजेपर्यंत ‘प्राणप्रतिष्ठापना’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराचा गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध असून या सणाचे प्रत्येक भाविक दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. याच बाप्पाच्या आगमनास काही तास शिल्लक राहिले असून त्या पार्श्वभूमीवर शहरातील मानाच्या गणपती मंडळाची तयारी पूर्ण झाली आहे. या गणपतीची 1 वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच सोमवारी (दि.१) वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक काढून बाप्पांचे आगमन होणार आहे.

मानाचा पहिला – कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
पुण्यातील मानाच्या या पहिल्या गणपतीची मिरवणूक सकाळी 9 वाजून 30 मिनीटांनी सुरु होणार आहे. ही मिरवणूक कुंटे चौक-श्रीलिंबराज महाराज चौक – आप्पा बळवंत चौक – बुधवार चौक – जिजामाता चौक अशी निघणार असून साडे अकराच्या सुमारास ही मिरवणूक मंडपात येणार आहे. या मिरवणूकीमध्ये देवळणकर बंधूंचे नगारावादन, प्रभात बँड आणि श्रीराम व संघर्ष ढोलताशा पथक सहभागी होणार आहे. कसबा गणपतीची प्रितिष्ठापना सकाळी ११ वाजून ४० मिनीटांनी होणार आहे.

मानाचा दुसरा – तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
पुण्यातील मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक सकाळी 10 वाजून 30 मिनीटांनी सुरु होणार आहे. ही मिरवणूक केळकर रस्ता – मंदार लॉज – कुंटे चौक – लक्ष्मी रस्ता – गणपती चौक अशी निघणार असून साडे बाराच्या सुमारास ही मिरवणूक मंडपात येणार आहे. या मिरवणूकीमध्ये सतीश आढव यांचे नगारावदान, न्यू गंधर्व ब्रास बँड, शिवमुद्रा, तालवाद्य आणि विष्णूनाद शंख ढोलताशा पथक सहभागी होणार आहे. तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रितिष्ठापना दुपारी १ वाजता होणार आहे.

मानाचा तिसरा – गुरुजी तालीम मंडळ
पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक सकाळी 9 वाजून 30 मिनीटांनी सुरु होणार आहे. ही मिरवणूक गणपती चौक – लिंबराज महाराज चौक – आप्पा बळवंत चौक – बुधवार चौक – बेलबाग चौक लक्ष्मी रस्त्याने बाराच्या सुमारास ही मिरवणूक मंडपात येणार आहे. या मिरवणूकीमध्ये जयंत नगरकर यांचे नगारावदान, अश्वराज बँड, नादब्रह्म, गुरुजी प्रतिष्ठान, गर्जना आणि येरवडा कारागृहातील कैद्यांचे ढोलताशा पथक सहभागी होणार आहे. गुरुजी तालीम गणपतीची प्रितिष्ठापना दुपारी १२ वाजून ३० मिनीटांनी होणार आहे.

मानाचा चौथा – तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
पुण्यातील मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. ही मिरवणूक गणपती चौक – लिंबराज महाराज चौक – आप्पा बळवंत चौक – बुधवार चौक – बेलबाग चौक लक्ष्मी रस्त्याने बाराच्या सुमारास ही मिरवणूक मंडपात येणार आहे. या मिरवणूकीमध्ये लोणकर बंधूंचे नगारावदान, वाद्यवृंद, भद्राय व श्री श्री रविशंकर शाळेचे ढोलताशा पथक सहभागी होणार आहे. तुळशीबाग गणपतीची प्रितिष्ठापना दुपारी १२ वाजून ३० मिनीटांनी होणार आहे.

मानाचा पाचवा – केसरी वाडा
पुण्यातील मानाच्या पाचव्या गणपतीची मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. ही मिरवणूक नारायण पेठेतील माणिकेश्वर विष्णू चौक – उंबऱ्या गणपती चौक – शेडगे विठोबा चौक- माती गणपती मंदिर येथून अकराच्या सुमारास ही मिरवणूक मंडपात येणार आहे. या मिरवणूकीमध्ये बिडवे बंधूंचे सनईवादन, श्रीराम व शिवमुद्रा ढोलताशा पथक सहभागी होणार आहे. केसरी वाडा गणपतीची प्रितिष्ठापना सकाळी ११ वाजून ३० मिनीटांनी होणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
नवसाला पावणारा आणि पुण्यातील मानाच्या गणपतींच्या बरोबरीने स्थान असणारा हा गणपती. या गणपतीची मिरवणुक सकाळी 8 वाजून 30 मिनीटांनी निघणार आहे. ही मिरवणूक मुख्य मंदिर – आप्पा बळवंत चौक – शनिपार चौक – टिळक पुतळा मंडई मार्गे मंडपात येणार आहे. मिरवणूकीमध्ये देवळणकर बंधूंचे चौघडा वादन, गायकवाड बंधूंचे सनई वादन होणार आहे. तर दरबार बँड, मयूर बँड बरोबरच ढोल ताशा पथक सहभागी होणार आहे. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

आजपासून वाहतूकीचे नियम तोडणं ‘अति’ महाग ! ‘रूल्स’चं उल्‍लंघन केल्यास 25000 पर्यंत दंड, जाणून घ्या

सावधान ! आजपासून ‘विना परवाना’ वाहन चालवल्यास 5000 रुपये ‘दंड’

सावधान ! ‘KYC’ केले नसल्यात आजपासून तुमचे Paytm आणि G-Pay सारख्या वॉलेटमधील पैसे अडकणार

खुशखबर ! आजपासून बँका ग्राहकांना देणार 59 मिनिटात ‘गृह’ आणि ‘वाहन’ कर्ज

खुशखबर ! आजपासून ‘SBI’ ग्राहकांना देणार स्वस्तात ‘गृह’ कर्ज, जाणून घ्या

आजपासून ‘बँक’ व्यवहाराशी निगडीत ‘हे’ 7 नियम बदलणार, दैनंदिन जीवनावर परिणाम, जाणून घ्या

शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! आजपासून 15 दिवसात 3 लाखाचं स्वस्त व्याजदाराचं ‘कर्ज’ आणि ‘किसान क्रेडिट कार्ड’, जाणून घ्या

आजपासून 1 कोटी पेक्षा अधिक ‘रोख’ रक्कम काढल्यास लागणार 2 % ‘टीडीएस’

खुशखबर ! आजपासून ‘SBI’ कडून वाहन, गृह, शैक्षिणक आणि पर्सलन ‘लोन’ स्वस्त, जाणून घ्या