इंदापूर महाविद्यालयात राजमाता जिजाऊ जयंतीची जय्यत तयारी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – शिवभक्त परिवार आणि शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर महाविद्यालयामध्ये स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे रविवार दिनांक 12 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8:30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये माँसाहेब जिजाऊंचे प्रतिक म्हणून सालाबाद प्रमाणे सर्व आजी – माजी सैनिक यांच्या माता किंवा पत्नी यांचे जिजाऊ पूजन शिवभक्त परिवार, इंदापूर यांच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच अमर शहीद जवान प्रदीपकुमार उमाकांत शेटे (गोतोंडी) यांच्या वीरपत्नी श्रीमती. पुष्पलता प्रदीपकुमार शेटे यांना या वर्षीचा जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार येसाजी कंक यांची दिव्य तलवार इंदापूर तालुक्यातील सर्व शिवप्रेमींना दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे.

शिवव्याख्याते डॉ.लक्ष्मण आसबे यांचे यावेळी व्याख्यान होणार आहे.महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा यावेळी उपस्थित राहणार असुन जयंतीची जय्यत तरारी करण्यात आली आहे. तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि डॉ.लक्ष्मण आसबे यांनी केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/