खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी सुरू

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीसाठी जिल्ह्यात लगबग सुरू झाली आहे. बळीराजा आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपुर्व तयारीला लागला असून बि बियाणे खते खरेदीच्या तयारीला लागला आहे.

लागवडीच्या क्षेत्रात चांगल्या वानाच्या बि-बियानांच्या शोधत शेतकरी दिसून येत आहे . परभणी, पाथरी, जिंतूर, पुर्णा, गंगाखेड, मानवत, सेलु , सोनपेठ या जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी कृषि निविष्ठांची चाचपणी करतांना शेतकरी दिसून येत आहेत. चतुर शेतकरी पाकिटा वरील लेबल पाहुण खरेदी करताना दिसत आहेत. शेती क्षेत्रातील आधुनिक औजारांची दुरुस्ती करण्याच्या कामात सध्या शेतकरी मग्न असल्याचे दिसून येत आहे

जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणसाठी लगबगीने तयारीसाठी सजा झाला असल्याचे चित्र दिसत आहे.

सिने जगत –

…म्हणून हॉलीवूड सिंगर सेलेना गोमेज सोशल मिडियापासून राहते ‘दूर’

‘रॅपर’ हनी सिंगचे ‘हे’ गाणे धुमाकूळ घालणार

ब्रेकअपनंतर अशी झाली होती शाहिद कपूरची ‘हालत’

#Video : म्हणून बोनी कपूरने सार्वजनिक ठिकाणी घातला होता श्रीदेवीच्या पँटमध्ये हात