‘विमा’ कंपनीला द्यावा लागेल ‘कोरोना’वरील उपचाराचा संपूर्ण खर्च, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – चीनच्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आता भारतात प्रवेश केला आहे. तीन दिवसाच्या आत येथे कोरोना व्हायरसचे 29 रूग्ण आढळले आहेत. या व्हायरसमुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. याच दरम्यान इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने (आयआरडीए) वीमा कंपन्यांसाठी एक सर्क्युलर जारी केले आहे, ज्यामध्ये कोरोना व्हायरसच्या उपचाराचा खर्चसुद्धा कव्हर व्हावा, असे म्हटले आहे. जर असे झाले तर असा भारत पहिला देश असेल जेथे कोरोना वीमा कव्हरमध्ये येतो. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 3 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 90 हजारपेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे.

ईरडाकडून जारी करण्यात आलेल्या सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की, आरोग्य वीमा गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने वीमा कंपन्यांना सूचना देण्यात आली आहे की, त्यांनी अशी पॉलिसी तयार करावी ज्यामध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांवर उपचार करता येतील. उपचाराचा पूर्ण खर्च उचलला जाईल, अशी पॉलिसी तयार करायची आहे. ईरडाने वीमा कंपन्यांना म्हटले आहे की, कोविड 19 संबंधीची प्रकरणाचे तातडीने मार्गी लावण्यात यावीत.

ईरडाने कोरोना व्हायरसबाबत सर्क्युलर जारी केल्यानंतर एसबीआय जनरल इन्शोरेजचे हेड सुब्रमण्यम बी यांनी म्हटले की, कोरोना व्हायरस दाव्याचा निपटारा तोपर्यंत होऊ शकतो जोपर्यंत रूग्ण 24 तास हॉस्पिटलमध्ये असेल. भारत सरकार किंवा जागतिक आरोग्य संघटनेने भारतात कोरोना व्हायरसला राष्ट्रीय आरोग्य आपत्ती जाहिर केल्यास अशावेळी वीमेची रक्कम मिळणार नाही, कारण असे आजार आरोग्य वीम्याच्या अंतर्गत येत नाहीत.

चीनमधील कोरोनाने आता भारतात पसरण्यास सुरूवात केली आहे. बुधवारी याची लागण झालेल्या रूग्णांची संख्या अचानक वाढून 29 झाली. संसर्ग झालेल्या लोकांमध्ये 16 इटलीचे पर्यटक आहेत.