Coronavirus : नाकाच्या बाहेरच ‘कोरोना’ला थांबविण्याची ‘तयारी’, भारतीय शास्त्रज्ञांनी कसली ‘कंबर’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय शास्त्रज्ञ आता असे लोशन तयार करीत आहेत ज्यामुळे कोरोना विषाणू नाकाद्वारे शरीरात प्रवेश करू शकणार नाही. यास नाकाच्या आत लावले जाईल. अशा परिस्थितीत रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह कर्मचार्‍यांसाठी हे लोशन खूप महत्वाचे ठरणार आहे.

जेल लोशनद्वारे विषाणू शरीराच्या पेशींमध्ये जाऊ शकत नाही.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मदतीने आयआयटी बॉम्बे येथील बायोलॉजिकल सायन्स आणि बायोइंजिनिअरिंग विभाग या प्रकल्पासंदर्भात वेगवान काम करत आहे. सुरुवातीच्या टप्प्यातही याने बर्‍यापैकी यश मिळवले आहे. सध्या हे काम दोन टप्प्यात केले जात आहे. यामधील प्रथम म्हणजे या जेल लोशनद्वारे विषाणू शरीराच्या पेशींमध्ये जाऊ शकत नाही.

विषाणूला निष्क्रिय करणे आवश्यक आहे

तथापि यानंतरही विषाणू सक्रिय राहू शकतो. अशात विषाणूला निष्क्रिय करणे आवश्यक आहे. त्याच वेळी, दुसऱ्या टप्प्यात अशा जैविक अणूंचा यात समावेश करण्याची योजना आहे, जे डिटर्जंट्ससारख्या विषाणूंना अडकवेल आणि निष्क्रिय करेल. या दोन्ही टप्प्यांवर वेगवान काम केले जात आहे.

हा विषाणू नाकावाटे प्रवेश करतो आणि मास्क लावल्याने देखील धोका कायम

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांच्या मते, कोरोनामुळे होणारा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका नाकातून विषाणूच्या प्रवेशामुळे होतो. कारण याद्वारे तो थेट घशात आणि नंतर फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. मास्क लावल्यानंतरही, विषाणू इतका सूक्ष्म आहे की त्याचा धोका कायम असतो.

कोरोनाशी सामना करण्यासाठी सीआयएसआरने कोर ग्रुप स्थापन केला

कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) एक कोर गट तयार केला आहे. ज्यामध्ये प्रमुख प्रयोगशाळेशी संबंधित आठ संचालकांचा समावेश आहे. यावेळी सर्वांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

सीएसआयआरच्या 38 प्रयोगशाळांमध्ये कोरोनाशी लढण्याचे काम सुरू आहे

देशभरात सीएसआयआर च्या एकूण 38 प्रयोगशाळा आहेत. जिथे कोरोनाशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. परंतु या कामांना पाच प्रकारात समाविष्ट करण्यासाठीही बारकाईने निरीक्षण केले जात आहे. जेणेकरून आपल्याला लवकरच निकाल मिळू शकेल. या कोर गटात सध्या ज्या आठ संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे त्यात डिजिटल व आण्विक निगराणीची जबाबदारी आयजीआयबीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल, टेस्टिंग किट तयार करण्याचे काम सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांना, तर औषधांचा विकास आयआयसीटीचे संचालक डॉ. एस. चंद्रशेखर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीचे संचालक डॉ. जितेंद्र जे. जाधव यांच्याकडे रुग्णालयांसाठी सहायक उपकरणे तयार करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. तसेच वैयक्तिक संरक्षक उपकरणांच्या पुरवठ्याची जबाबदारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमचे संचालक डॉ. अंजन रे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर आयआयआयएमचे संचालक डॉ. राम ए. विश्वकर्मा यांना या संपूर्ण गटाचे समन्वयक केले गेले आहे.