SBI क्लार्क पदाच्या परीक्षेसाठी करा ‘अशी’ तयारी; पहिल्याच प्रयत्नात मिळू शकेल यश

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेत आता लिपिक पदासाठी भरती केली जाणार आहे. त्यानुसार, लिपिक पदाच्या 5000 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. बँकेने याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध केली आहे.

लिपिक पदासाठीच्या या परीक्षेची तयारी करण्यासाठी एक महिना उरला आहे. तेव्हा चांगल्या सरकारी नोकरीची संधी देणाऱ्या या परीक्षेची तयारी कशी करण्याबाबत मार्गदर्शन…इंग्रजी भाषा, रिझनिंग क्षमता आणि क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टीट्यूडबाबत प्रश्न विचारले जातील, तर मुख्य परीक्षेत या विषयांसह सामान्य ज्ञानाचाही समावेश असेल. या परीक्षेत एकूण तीन पेपर असतील. प्रत्येक पेपर सोडवण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ असेल.

इंग्लिश अनिवार्य…

सर्व बँक भरती परीक्षांमध्ये इंग्रजी भाषा अनिवार्य विषय आहे. इंग्रजी भाषेचा पेपर प्रामुख्याने व्याकरण आणि शब्दसंग्रहावर आधारित असेल. बँकेला उमेदवाराचे इंग्रजी व्याकरणाचे ज्ञान आणि लेखन कौशल्याची चाचणी घ्यायची असते. त्यामुळे या पेपरमध्ये व्याकरण आणि लिखाणावर भर असतो. यासाठी उमेदवारांनी इंग्रजी भाषेचे व्याकरण समजून घेण्यावर भर द्यावा.

दररोज चार-पाच प्रश्न सोडवा

दररोज एक धड्याचा अभ्यास करून त्यावरील चार-पाच प्रश्न सोडवा. याशिवाय डेटा इंटरप्रिटेशनमध्ये पाढे, बार ग्राफ, पाय चार्ट याचा सराव करा. दररोज एका भागाचा अभ्यास करून प्रश्न सोडवण्याची तयारी केल्यास वेळेत सगळा अभ्यास पूर्ण होईल. रेशो म्हणजे गुणोत्तर, सर्ड्स आणि पॉवर्स, पर्सेंटेज यांच्या अभ्यासानं न्यूमेरिकल अ‍ॅबिलिटी पेपरची तयारी सुरू करा. पहिल्यांदा या सगळ्या संकल्पना स्पष्ट करून घ्या आणि नंतर त्यावरील सराव प्रश्न सोडवा. यानंतर नंबर सिरीजचा अभ्यास करा.

क्लार्क परीक्षा 2021 पॅटर्न –

  • – इंग्रजी भाषेच्या पेपरमध्ये 30 प्रश्न आणि इतर पेपरमध्ये प्रत्येकी 35 प्रश्न विचारले जातील.
  • – प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश म्हणजेच पाव गुण वजा केला जाईल.
  • – एकूण 100 गुणांची परीक्षा असेल. 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवावे लागतील.
  • – परीक्षेत इंग्रजी भाषा, न्युमरिकल अ‍ॅबिलिटी आणि रिझनिंग अ‍ॅबिलिटीचे पेपर असतील.