लोकसभेला वेगळा विचार करण्याचे तयारीत ? श्रीगोंदा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक : विखेंना बसणार फटका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील कामठी, लिंपणगाव, आढळगाव, हिरडगाव, ढवळगाव, राजापूर, माठ, टाकळी, कोकणगाव, ढोरजा, पारगाव, भावडी आदी गावांतील भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत वेगळा विचार करण्याची भूमिका जाहीर केली आहे.

भाजपा पार्टीत आजपर्यंत मोठे नेत्यांनी पक्षात ये-जा केली. पण या नेत्यांनी कधीही पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कधीही विचारात घेतले नाही. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांवर कायम दुसऱ्या पक्षातील आलेल्या नेत्यांमुळे अन्याय झाला आहे. आयात केलेल्या नेत्यांमुळे फरफट झालेल्या श्रीगोंदा तालुक्यातील निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांवरपालकमंत्री व पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडून भविष्यात कार्यकर्त टिकून ठेवायचे असल्यास पक्षश्रेष्ठींना निष्ठावंताचा विचार करावा लागेल, अशी जाहीर नाराजी सर्व कार्यकत्यांनी व्यक्त केली आहे.

या बैठकीस देवराम वाकडे, राजेंद्र मोटे, राजेंद्र औटी कोकाटे, राहुल भंडारी, नंदकुमार साहेबराव रासकर, बळीराम बोडखे, सचिन गायकवाड, सुभाष कांबळे, गंगाराम दरेकर, अनिस हवालदार, रामा बनकर, वागसकर, शांताराम वाबळे, राजेंद्र भोस, मुक्तार शेख,
गोरख आळेकर, दिलीप वाळुंज, शहाजी शिरसाठ, दत्तात्रय जामदार, बाळासाहेब बनकर, राजेंद्र मखरे रमेश गिरमे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.