भारतामध्ये जगातील पहिली ‘हायपरलूप’ ट्रेन चालविण्याची तयारी, 1200km असणार ‘स्पीड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील पहिली हायपरलूप ट्रेन भारतात धावू शकते. हायपरलूप ट्रेन एका हवाबंद पाईपमधून धावते आणि तिचा वेग 1200 किमी प्रति तास पर्यंत पोहोचतो. हायपरलूपसंबंधित वर्जिन समूहाने आपला प्रस्ताव रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर मांडला आहे. या प्रकल्पासंबंधित महाराष्ट्र सरकारशी पहिल्यांदा देखील चर्चा झाली आहे, परंतु शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यानंतर हा प्रकल्प रोखण्यात आला ज्यानंतर आता या समूहाचे प्रतिनिधी नितीन गडकरी यांच्याशी पुन्हा चर्चा करण्याच्या प्रयत्न आहे.

दिल्ली मुंबई दरम्यान हायपरलूप प्रस्ताव –
कंपनीच्या प्रतिनिधींनी दिल्ली ते मुंबई दरम्यान 1300 किमी लांबीचा प्रस्ताव ठेवला आहे. वर्जिन समूहाने मुंबई आणि पुणे दरम्यान देखील ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव मांडला होता, त्याला तत्कालीन भाजप सरकारच्या काळात मंजूर झाला होता. प्रकल्पाच्या पहिल्या फेजमध्ये 11.8 किमी लांबीचा ट्रॅक तयार करण्यात येणार होता ज्यासाठीचा 10 अरब डॉलरचा खर्च होता. हे बनण्यासाठी 2.5 वर्ष लागणार होते.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द –
सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनसह अनेक प्रकल्प रद्द केले तर अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. अजित पवार म्हणाले होते की आपली आर्थिक परिस्थिती आता अशी नाही की आपण हायपरलूप सारखा प्रकल्प आपल्या देशात राबवू शकू. सध्या प्रवासासाठी दुसऱ्या माध्यमांचा विचार केला जाईल. जेव्हा अशा प्रकारचे तंत्रज्ञान दुसऱ्या देशात राबवली जाईल, जेव्हा यावर विचार केला जाईल.