Coronavirus : पुण्यात होतंय ‘लॉकडाऊन’ नियमांचं उल्लंघन, 20 हजार लोकांच्या स्थलांतराची तयारी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना व्हायरस वेगाने पसरत असून अशा परिस्थितीत लोकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु बर्‍याच ठिकाणी लोक इच्छित असले तरीही लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करू शकत नाहीत.

ताजे प्रकरण पुण्यातील असून पुण्यात ५ विभाग हॉटस्पॉट आहेत. भवानी पेठ, कसबा पेठ, ढोले पाटील रोड, येरवडा आणि घोले रोड. या भागात ७० हजार झोपडपट्ट्या असून त्यात अतिशय कमी जागेत मोठ्या संख्येने लोक राहतात.

लोकांची घरे छोटी असल्याने सोशल डिस्टंसिंगचे पालन होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत यातील २० हजार लोकांना काही काळ दुसर्‍या ठिकाणी शिफ्ट करण्याची तयारी चालू आहे. त्यांना जवळच्या शाळांमध्ये, पालिकेच्या मोकळ्या खोल्यांमध्ये, गोदामांमध्ये, मंगल कार्यालयात ठेवले जाईल. आणि त्यांना त्याच ठिकाणी अन्न आणि इतर दुसऱ्या गोष्टी मिळतील.

लोकांना शिफ्ट करणे देखील इतके सोपे नसून लोक सहजपणे घरे सोडण्यास तयार होणार नाहीत. मग त्यांना जिथे शिफ्ट केले जाणार आहे, तिथे खाण्या-पिण्यापासून ज्या मूलभूत गोष्टी आहेत, त्याची व्यवस्था करणे देखील एक मोठे आव्हानच आहे.

ही केवळ पहिल्या टप्प्यातील गोष्ट आहे, जर परिसरात वाढणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवले नाही तर लाखोंच्या संख्येने लोकांना शिफ्ट केले जाऊ शकते.

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुण्याला रेड झोनमध्ये ठेवण्यात आले असून शहर दोन भागात विभागले गेले आहे, एक पुणे शहर आणि दुसरे पुणे जिल्हा. मंगळवारी सकाळपर्यंत आकड्यांनुसार पुण्यात कोरोनाचे १२१७ रुग्ण आणि संपूर्ण जिल्ह्यात १३४८ रूग्ण आहेत. इतकेच नाही तर पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत ७५ लोकांचा मृत्यू झाला आहे.