‘रोगाचे निदान केल्याशिवाय औषधे देणे हा सदोष हलगर्जीपणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
एखाद्या रुग्णाला त्याच्या त्रासाचे योग्य निदान केल्याविनाच औषधे सांगणे म्हणजे “सदोष हलगर्जीपणा “आहे असे महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई  उच्च  न्यायालयाने नोंदवले आहे. एका रुग्ना महिलेच्या मृत्यूमुळे अटकेलची टांगती तलवार असलेल्या रत्नागिरीतील डॉक्टर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. या डॉक्टर दांपत्याला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी यासाठी न्यायमुर्ती  साधना जाधव यांनी आपल्या या निकालाला २ ऑगस्टपर्यंत स्थगितीही दिली आहे.
[amazon_link asins=’B0776P1FYH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’306f8104-9182-11e8-8ede-eb2d18180aa2′]याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  एका प्रकरणात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर संजीव पावसकर यांच्या नर्सिंग होम मध्ये फेब्रुवारी मध्ये एका महिलेची प्रसूती झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी या महिलेला तिच्या बाळासहित घरी जाऊ देण्यात आले . मात्र नंतर महिला आजारी पडल्यामुळे तिच्या नातेवाईकांपैकी एकाने डॉ. दीपा यांना संपर्क साधला. तेव्हा, डॉ. दीपा यांनी त्यांना मेडिकल दुकानात जाऊन केमिस्टशी फोनवर आपले बोलणे करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी केमिस्टला फोनवरून औषध सांगितल्यानंतर केमिस्टने त्या नातेवाईकाला औषध दिले. मात्र, ते औषध घेऊनही महिलेला आराम पडला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी तिला डॉ. पावसकरांच्या नर्सिंग होममध्ये नेले असता दोन्ही डॉक्टर उपलब्ध नव्हते. तसेच अन्य निवासी डॉक्टरही नव्हते. त्यामुळे नातेवाईकांनी महिलेला अन्य रुग्णालयात हलवले. मात्र, तोपर्यंत तिची प्रकृती खालावली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. त्या रुग्णालयाने आधीच्या रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचे कारण सांगितले. त्यामुळे नातेवाईकांनी पावसकर दाम्पत्याविरोधात पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा (भादंवि कलम ३०४) गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यासाठी कमाल जन्मठेपेची शिक्षा आहे. ‘आम्हाला फार तर हलगर्जीपणामुळे मृत्यू या कलम ३०४(४)खाली दोषी धरले जाऊ शकते, ज्यात कमाल दोन वर्षांची शिक्षा आहे’, असा युक्तिवाद या दाम्पत्याने केला. मात्र, न्या. जाधव यांनी तो अमान्य केला.
[amazon_link asins=’B01K4K6266′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16165bab-9182-11e8-9bb3-2dd2105528a3′]
‘जेव्हा डॉक्टर आपल्या कर्तव्यात चूक करतो तेव्हा तो फौजदारी प्रकारचा हलगर्जीपणा ठरतो. वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टरांना कायद्याने उदारपणे संरक्षण दिलेले आहे. मात्र, या व्यवसायाच्या नैतिक मूल्यांकडे न्यायालय दुर्लक्ष करू शकत नाही. निदानात चूक झाली असती तर कलम ३०४(४) अन्वये हलगर्जीपणा गृहित धरता आला असता, मात्र या प्रकरणात अर्जदारांनी निदान न करताच औषधे सांगून जाणतेपणी हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे तो सदोष हलगर्जीपणा ठरतो. अर्जदारांच्या म्हणण्याप्रमाणे पीडितांना केवळ आर्थिक नुकसानभरपाई दिल्याने त्या बाळाला त्याची आई आणि पतीला तिची पत्नी मिळणार नाही. त्यामुळे नीतीमूल्ये पाळून या उदात्त व्यवसायात मोठे योगदान देणाऱ्या डॉक्टर व रुग्णालयांचा सन्मान राखण्याच्या हेतूने अशा बेजबाबदार डॉक्टरांना बाहेर काढण्याची वेळ आली आहे’, असे महत्त्वाचे निरीक्षणही न्यायमूर्तींनी निकालात नोंदवले.