महापालिकेचा साडेसातशे कोटींचा अर्थसंकल्प सादर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेमुळे पाच महिन्यापासून लालफितीत अडकलेले महापालिकेचा अर्थ साडेसातशे कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला आहे. यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यास सात महिने राहिले असून, या सात महिन्यांत साडेसातशे कोटी खर्चाचे आव्हान पदाधिकाऱ्यांसमोर आहे.

महापालिकेचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक प्रशासनाने फेब्रुवारीमध्ये स्थायी समितीला सादर केले होते. स्थायी समितीत अंदाजपत्रकावर चर्चा झाली. सदस्यांनी शिफारशी सूचविल्या होत्या. अंदाजपत्रक शिफारशींसह अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत सादर करणे बंधनकारक असते. अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर होण्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा होऊ शकली नाही.

पदाधिकाऱ्यांनी अर्थसंकल्पीय सभा घेण्यात चालढकल केली होती. आज सदरची अर्थसंकल्पीय सभा घेण्यात महापौरांना मुहूर्त सापडला. स्थायी समिती सभापतींनी महासभेकडे सव्वासातशे कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

आरोग्य विषयक वृत्त

‘या’ कारणांमुळे हाताच्या बोटांना येते सूज

‘या’ कारणांमुळे हाताच्या बोटांना येते सूज

लहान मुलांचा ‘टिफिन’ देताना घ्या ही काळजी

जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म