‘नागरिकत्व’ विधेयकावर राष्ट्रपतींची मंजुरी, ईशान्य भारतात विरोध सुरुच

नवी दिल्ली : वृत्त संस्था – संसदेतील दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करुन मंजुरी दिली आहे. आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. ईशान्स भारतात या विधेयकाला असलेला विरोध अजूनही तीव्र होत आहे. आसाम, त्रिपुरामधून आता हा विरोध मेघालयापर्यंत पोहचला आहे.

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत हे विधेयक मंजुर झाल्यानंतर भाजपाच्या खासदारांनी जल्लोष केला होता. या दुरुस्ती बिलामुळे आता अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला देशातील धार्मिक कारणावरुन छळवाद होणाऱ्या हिंदु, शिख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिस्चन समाजातील लोकांना आता भारतीय नागरिकत्व मिळण्यातील अडसर दूर झाला आहे.

या विधेयकाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे एमआयएमचे खासदार ओवेसी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे जरी हा कायदा झाला असला तरी त्याची अंमलबजावणी सुरु होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ईशान्य भारतातील आंदोलनाने आणखी उग्र स्वरुप धारण केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/