राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार

चंदिगड : वृत्तसंस्था

सीबीएसईची टॉपर असलेल्या ‘राष्ट्रपती पुरस्कार’ विजेत्या विद्यार्थीनीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हरयाणाच्या रेवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे हरयाणात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
[amazon_link asins=’B01N4J3WAE,B0073C7IIK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f19d9871-b803-11e8-8344-e3b316934142′]

ही विद्यार्थीनी रेल्वेच्या परीक्षेची तयारी करत होती. त्यामुळे तिने महेंद्रगड येथील कनिनामध्ये कोचिंग क्लास लावला होता. क्लासवरून परतत असताना तीन तरुणांनी तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर पीडित मुलीच्या आईने पोलीस हे प्रकरण तपासण्यात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

पण पोलिसांनी अजून काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत पहिली आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या मुलीचा सत्कार केला होता. मोदी म्हणतात, ‘मुलीला शिकवा, मुलीला वाचवा’. परंतु, आता मी माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून दाद मागत आहे, असंही त्या म्हणाल्या.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.