President Election 2022 | शरद पवार ‘राष्ट्रपती’ पदासाठीचे उमेदवार, विरोधी पक्षाची सहमती?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभा निवडणुकीनंतर (Rajya Sabha Election) आता राष्ट्रपती निवडणुकीकडे (President Election 2022) सर्वांचे लक्ष लागले आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक (President Election 2022) होणार आहे. त्यापूर्वी विरोधी पक्षांमध्ये (Opposition Parties) बैठकीचा सिलसिला सुरु झाला आहे. राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाकडून एकच उमेदवार असावा असा प्रयत्न होत आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांमध्ये सर्वात आघाडीचं नाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचे आहे. पुढील दोन दिवसांत दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. यामध्ये शरद पवार यांच्या नावाचा विचार झाल्यास विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Congress Senior leader Mallikarjun Kharge) यांनी गुरुवारी शरद पवार यांची सिल्व्हर ओक याठिकाणी भेट घेतली. शरद पवार यांच्या नावावर काँग्रेसही सहमत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यानंतर खरगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन (Tamil Nadu CM MK Stalin) यांच्यासोबत चर्चा केली. रविवारी आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते संजय सिंह (Sanjay Singh) यांनीही शरद पवार यांना फोन करुन त्यांच्यासोबत संवाद साधला. शरद पवार विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांचे चांगले संबंध आहेत.

 

महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन करुन सत्ता स्थापन करण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला (Shivsena) सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी 8 राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षातील 22 प्रमुख नेत्यांना पत्र पाठवत 15 जूनला दिल्लीत होणाऱ्या संयुक्त बैठकीचं निमंत्रण दिले. या बैठकीमध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत शरद पवारांच्या नावाबाबत एकमत होईल असेही बोलले जात आहे.

18 जुलै रोजी देशात राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार असून 21 जुलैला निकाल येईल.
संविधान (Constitution) नियमानुसार, देशात विद्यमान राष्ट्रपतीचा कार्यकाळ
संपण्यापूर्वी पुढील राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक (President Election 2022) होणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.
आकडेवारीचे गणित लावले तर भाजप लोकसभा आणि राज्यसभेत मजबूत स्थितीत आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.
अशावेळी भाजपच्या विरोधात शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी आणि मजबूत उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी विरोधी पक्षाने केली आहे.

 

Web Title :- President Election 2022 | president election 2022 sharad pawar may be presidential candidate from opposition challenge the bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा