President Election | शरद पवारांना राष्ट्रपती बनवण्यासाठी प्रशांत किशोर यांची कसरत ! राहुल गांधींसोबतच्या बैठकीची Inside story

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  President Election | कोरोना संकटनंतर आता देशात राजकीय घटनाक्रम वेगाने बदलत चालला आहे. पुढील वर्षी अनेक राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणूकांसह (Assembly Elections) राष्ट्रपती निवडणूक (President Election) आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी सुद्धा हालचाल सुरू झाली आहे. निवडणूक रणनीती तज्ज्ञ प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांची मंगळवारी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याशी झालेली बैठक या पार्श्वभूमीवर खुप महत्वाची मानली जात आहे. President Election | prashant kishor rahul gandhi meeting story sharad pawar for president

असे म्हटले जात आहे की, प्रशांत किशोर (Prashant Kishor) सर्व विरोधकांना एकत्र करण्याच्या कामाला लागले आहेत.
प्रयत्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांना पुढील राष्ट्रपती पदाचे उमेदवार (President Candidate) म्हणून सादर करता येईल.
प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर सुमारे तीन वेळा शरद पवार यांची भेट घेतली आहे.

सोबत येणार का नवीन पटनायक?

प्रशांत किशोर यांच्या कॅलक्युलेशननुसार, जर विरोधीपक्षांची एकजुट झाली तर इलेक्टोरल कॉलेज (Electoral college) च्या बाबतीत सरकारसमोर त्यास मजबूती मिळेल.
सोबतच विरोधी पक्षांसोबत बीजेडीचे नवीन पटनायक आले तर हा मार्ग आणखी सोपा होईल.

कारण महाराष्ट्र आणि तामिळनाडुसारख्या मोठ्या राज्यांत सध्या विरोधी पक्षांचे सरकार आहे, अशावेळी येथून जास्त जागा मिळण्याची आशा आहे.
केवळ ओडिसाच एक ग्रे एरिया आहे, जिथे नवीन पटनायक पूर्णपणे विरोधी पक्षाच्या गटात उभे असल्याचे दिसत नाही.

सूत्रांनुसार, या बाबतीत प्रशांत किशोर यांनी नवीन पटनायक, एमके स्टालिन यांची सुद्धा भेट घेतली आहे.
मात्र, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पीकेने काँग्रेसला सांगितला पूर्ण प्लॅन!

आता मंगळवारी प्रशांत किशोर आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यात झालेल्या बैठकीकडे विरोधी पक्षांमध्ये जमलेला बर्फ वितळवणारी बाब म्हणून पाहिले जात आहे.
राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांची ही भेट दोन तासापेक्षा जास्त वेळ चालली.
पीके यांचे म्हणणे आहे की जर विरोधीपक्षांची एकजुट झाली तर भाजपा गेमप्लॅन उद्ध्वस्त करता येऊ शकतो, अशावेळी 2024 च्या निवडणुकीपूर्वी हे फायदेशीर होईल.

प्रशांत किशोर यांचे ममता बनर्जी, जगन रेड्डी, अरविंद केजरीवाल, एम.के. स्टालिन, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत.
अशावेळी त्यांना सोबत आणण्यात जास्त अडचण येणार नाही, परंतु काँग्रेसला सोबत घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

मंगळवारी झालेल्या बैठकीत राहुल गांधी, प्रियंका गांधी होते आणि असे समजते की सोनिया गांधी यांनी सुद्धा व्हिडिओद्वारे सहभाग घेतला.
प्रशांत किशोर यांच्याकडून काँग्रेस लीडरशिपला एक प्रेझेंटेशन देण्यात आले, ज्यामध्ये काँग्रेसला विविध राज्यांची स्थिती समजावून सांगण्यात आली.

Web Title : President Election | prashant kishor rahul gandhi meeting story sharad pawar for president

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Indore police | इंदूर पोलिसांची वेबसाईट हॅक; बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याने शहरात रेड अलर्ट

Chandrapur News | बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; घरात शिरुन महिलेवर केला हल्ला

Corona in India : कोरोना संकटाचा कहर सुरूच ! 24 तासात आढळले 38 हजार नवीन रूग्ण, 624 संक्रमितांचा मृत्यू