राष्ट्रपतींनी स्वीकारला हरसिमरत कौर यांचा राजीनामा, नरेंद्र तोमर यांच्याकडे पदभार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान मोदींच्या सल्ल्यानंतर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हरसिमरत कौर यांचा मंत्रिमंडळातील राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. घटनेच्या कलम 75 च्या खंड (2) अंतर्गत केंद्रीय मंत्री मंडळाकडून हरसिमरतचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. पंतप्रधानांसोबत सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रपतींनी कॅबिनेट मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना त्यांच्या विद्यमान विभागांव्यतिरिक्त अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा कार्यभार देण्याचे निर्देश दिले.

मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याविषयीची माहिती हरसिमरत कौर बादल यांनी ट्विट केली होती. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, शेतकरीविरोधी अध्यादेश आणि कायद्याच्या निषेधार्थ मी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. एक मुलगी व बहीण म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचा त्यांना अभिमान आहे. हरसिमरत कौर बादल केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री होत्या. हा निर्णय घेण्यात आला कारण भाजपाचा मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल अध्यादेशास विरोध करीत आहे.

यापूर्वी गुरुवारी लोकसभेत हे विधेयक मांडले गेले असता शिरोमणी अकाली दलाचे खासदार सुखबीर सिंह बादल यांनी निषेध केला होता. त्यांनी सरकारला मोठा धक्का देत म्हटले होते की, हरसिमरत कौर बादल या मंत्रीपदाचा राजीनामा देतील. तथापि, शिरोमणी अकाली दल सरकारला पाठिंबा देत राहील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like