मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांची नियुक्ती 

दिल्ली : वृत्तसंस्था-राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून आज नियुक्ती केली. सुनील अरोरा हे २ डिसेंबर रोजी पदभार स्विकारणार आहेत. सुनील अरोरा हे गेल्या वर्षी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयातील माहिती व प्रसारण सचिव होते.

मतदान यंत्रे (ईव्हीएम) मधील अनियमितता तपासण्यासाठी व्हीव्हीपीएटी मशीन्सच्या विस्तृत वापरासाठी ओ. पी. रावत यांनी एक महत्त्वाची भूमीका बजावली आहे.

सुनील अरोरा हे १९८० च्या बॅचचे राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. अरोरा यांनी वित्त, वस्त्र आणि नियोजन आयोगासारख्या मंत्रालयांमध्ये व विभागांमध्ये काम केले आहे. १९९९-२००२ दरम्यान नागरी उड्डयन मंत्रालयामध्ये त्यांनी संयुक्त सचिव म्हणून काम केले तसेच सीएमडी, इंडियन एअरलाइन्समध्ये पाच वर्षे काम पाहिले आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुधरा राजे यांचे ते सर्वात विश्वसनीय अधिकारी होते. त्यांनी २००५ ते २००८ पर्यंत त्यांचे मुख्य सचिव होते.