ब्राझीलचे राष्ट्रपती ‘बोलसोनारो’ असणार 26 जानेवारीच्या परेडमधील प्रमुख पाहुणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर मेसियास बोलसोनारो 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) रोजी प्रमुख अतिथी म्हणून भारतात येणार आहेत. मंदीमुळे त्रस्त दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापरी संबंध वाढवण्यासाठी आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी बोलसोनारो शुक्रवारी भारतात येणार आहेत. यावेळी ते 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असणार आहेत.

राष्ट्रपती म्हणून पदभार स्विकारल्यानंतर बोलसोनारो यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. बोलसोनारो यांच्यासोबत 7 मंत्री, उच्च अधिकारी आणि एक मोठं व्यावसायिक प्रतिनिधीमंडळही असणार आहे.

24 ते 26 जानेवारी पर्यंत बोलसोनारो भारत दौऱ्यावर
परराष्ट्र मंत्रालयानं ट्विट केलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानंतर ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर मेसियास बोलसोनारो 24 ते 27 जानेवारीपर्यंत भारत दौऱ्यावर असणार आहेत. 26 जानेवारी रोजी होणाऱ्या भारताच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ते प्रमुख पाहुणे असणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत आण ब्राझील यांच्यातील बहुपक्षीय संबंध वाढून त्यांना बळकटी येईल अशी आशा आहे.”

1996, 2004 साली देखील प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे बनले आहेत ब्राझीलचे राष्ट्रपती
2016 मध्ये ब्राझीलचे राष्ट्रपती मिशेल टेमेर गोव्यात आयोजित 8व्या ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. मोदी 11 व्या ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होण्यसााठी ब्राझीलला गेले होते. 1996 आणि 2004 मध्ये ब्राझीलचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते.

फेसबुक पेज लाईक करा –