अमेरिकेनं भारताला दिला मोठा झटका ! डोनाल्ड ट्रंप यांनी केली H1-B Visa वर निर्बंधाची घोषणा

वॉशिंग्टन : कोरोना संकटात अमेरिकेत बेराजगारी वाढल्याने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा झटका देत एच1-बी वीजावर निर्बंध आणल्याची घोषणा केली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत यावर बंदी असणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाने जगभरातून अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणार्‍या सुमारे अडीच लाख लोकांना धक्का बसला आहे. यामुळे सर्वात मोठे नुकसान भारतीय नोकरदारांना होणार आहे. अमेरिकेतील कंपन्यांमध्ये काम करणार्‍या परदेशी कामगारांना मिळणार्‍या वीजाला एचवनबी वीजा म्हणतात. हा वीजा एका ठराविक कालावधीसाठी जारी केला जातो.

अमेरिकेत काम करण्यासाठी एचवनबी वीजा घेणार्‍यांमध्ये सर्वात जास्त भारतीय आयटी प्रोफेशनल्स असतात. या वीजा निर्बंधामुळे सर्वात जास्त नुकसान भारतीयांचे होणार आहे. परंतु, असेही समजले जात आहे की, नव्या वीजा निर्बंधाचा सध्या वर्क वीजावर अमेरकिेत काम करणार्‍या लोकांवर परिणाम होणार नाही.

एचवनबी वीजाबाबत जाणून घ्या

अमेरिकेत काम करत असलेल्या कंपन्यांना जर परदेशातील व्यक्तीला नोकरी द्यायची असेल तर कर्मचारी एचवनबी वीजा घेऊनच अमेरिकेत कोणत्याही खासगी कंपनीत काम करू शकतो. भारतातून मोठ्या संख्येने आयटी प्रोफेशनल्स एचवनबी वीजासह अमेरिकेत काम करण्यासाठी जातात.

एचवनबी वीजा 3 वर्षांसाठी दिला जातो, जो कमाल 6 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. एचवनबी वीजा संपल्यानंतर अर्जदाराला अमेरिकन नागरिकत्वासाठी अर्ज करावा लागतो. यासाठी अर्जदाराला ग्रीनकार्ड दिले जाते.

एचवनबी वीजा संपल्यानंतर अर्जदाराला ग्रीनकार्ड मिळाले नाही तर त्यास पुढील एक वर्षासाठी अमेरिकेच्या बाहेर राहावे लागेल आणि एक वर्षानंतर पुन्हा एचवनबी वीजासाठी अर्ज करावा लागेल.

हा वीजा काम करणे आणि अमेरिकेच्या कायम नागरिकत्वासाठी अर्ज या दोन्हीसाठी दिला जातो. परंतु अर्जदाराला वीजा संपण्यापूर्वी ग्रीनकार्डसाठी अर्ज करावा लागतो.

याचा सर्वात जास्त फायदा म्हणजे यासाठी कोणीही परदेशी नागरिक अर्ज करू शकतो. या वीजाअंतर्गत वीजाधारक आपल्या मुलांना आणि पती/पत्नीला अमेरिकेत आणू शकतो. ते सुद्धा तेवढीच वर्षे अमेरिकेत राहू शकतात.

या वीजानंतर कायम नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो. याचे सर्वातमोठे अट्रॅक्शन हे आहे की, या वीजासाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते केवळ बॅचलर डिग्री आणि कोणत्याही अमेरिकेत काम करणार्‍या कंपनीचे ऑफर लेटर यासाठी जरूरी असते.