माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा संघाच्या व्यासपीठावरून देशभक्तीचा नारा

नागपूर :पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत नागपुरात झाला. यावेळी प्रणव मुखर्जींनी राष्ट्र, राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना याठिकाणी मांडली. यावेळी सरसंघचालक शेवटी बोलण्याच्या प्रथेला आज फाटा देत मुखर्जी यांना शेवटी बोलण्यास सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समारंभासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. प्रणव मुखर्जी यांनीही आपल्या संबोधनामधून देशाच्या समृद्ध इतिहासाला उजाळा दिला. तसेच एकात्मतेला बाधा ठरणार हिंसाचारी घटनांचा निषेध केला.

भाषणातील काही महत्वाची मुद्दे

वसुधैव कुटुंबकम् हीच भारताची खरी ओळख असल्यामुळे सर्वांसाठी देशाचे दरवाजे कायम खुले असल्याचं प्रणव मुखर्जींनी सांगितले.

भारताचा राष्ट्रवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारित, त्यामुळे भारताचे दरवाजे सर्वांसाठी खुले.

इसवी सन पूर्व 600 पासून 1800 वर्षांपर्यंत भारत जगासाठी शैक्षणिक केंद्र, याच काळात चाणक्यने अर्थशास्त्र लिहिले.

भारताची आत्मा सहिष्णुतेतच आहे, वेगळा रंग, भाषा, वेगळी ओळख आहे, हिंदू मुस्लिम, शिख, इसाईमुळे भारत एक आहे.

विविधतेत एकता हेच भारताचं सौंदर्य, भेदभाव करत राहिल्यास जगात भारताची प्रतिमा बिघडेल.

भारत एक धर्म, एका भाषेचा देश नाही. राष्ट्रवाद जाती, धर्म, भाषेपेक्षा उंच आहे.