निर्भया केस : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोषी मुकेश सिंहचा दयेचा अर्ज फेटाळला, आता फाशी निश्चित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निर्भया गँगरेप केसमधील आरोपी मुकेश सिंह याची याचिका फेटाळली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं निर्भया केसमधील आरोपींपैकी एकाची याचिका शुक्रवारी रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली होती. आरोपी मुकेश सिंहनं काही दिवसांपूर्वीच दया याचिका दाखल केली होती. मंत्रालयानं ही याचिका अस्विकार करावी अशी शिफारसही करण्यात आली होती. निर्भया गँगरेप आणि मर्डर केसमधील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दिल्लीच्या उपराज्यपालांनी गुरुवारी मुकेश सिंह याची दया याचिका गृह मंत्रलयाकडे पाठवली होती. याच्याच एक दिवस आधी दिल्ली सरकारनं ही याचिका अस्विकार करण्यासाठी शफारस केली होती. दिल्ली कोर्टानं 32 वर्षीय मुकेश सिंह, 26 वर्षीय विनय शर्मा, 31 वर्षीय अक्षय कुमार सिंह आणि 25 वर्षीय पवन गुप्ता या चारही आरोपींना मृत्यूची शिक्षा सुनावत 7 जानेवारी रोजी डेथ वॉरंट जारी केलं होतं. त्यावेळी कोर्टानं फाशी देण्यासाठी 22 जानेवारी ही तारीख ठरवली होती.

आज डेथ वॉरंटवर सुनावणी

आप सरकार दिल्ली हायकोर्टाला बुधवारी म्हटलं होतं की, “केसमधील आरोपी मुकेश कुमार सिंह, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह आणि पवन गुप्ता यांना पूर्वनिर्धारीत तारीख 22 जानेवारी रोजी फाशी दिली जाऊ शकत नाही. कारण त्यातील एका आरोपीनं दया याचिका दाखल केली आहे. आणि कारावास नियमावलीनुसार, जोपर्यंत सर्व कायदेशीर पर्याय समाप्त होत नाही तोपर्यंत फाशी दिली जाऊ शकत नाही.”

अशात मुकेश सिंहची याचिका फेटाळण्यात आली आहे. यानंतर आता आज(शुक्रवार दि 17 जानेवारी) डेथ वॉरंटवर सुनावणी होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/