गर्दीतील मित्राला पाहून ‘प्रोटोकॉल’ विसरले राष्ट्रपती कोविंद, मंत्री पाठवून बोलावलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मैत्री हे असे नाते आहे ज्यात लोक पैसा, प्रतिष्ठा, पद अशा कोणत्याही गोष्टी न पाहता केवळ निस्वार्थी पणाचे नाते निभावतात. असाच एक प्रकार सोमवारी पहायला मिळाला. एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गर्दीमध्ये उभ्या असलेल्या आपल्या एका जुन्या मित्राला पाहिले आणि लगेच अधिकाऱ्यांना आदेश देऊन त्याला आपल्याकडे बोलावून घेतले आणि मंचावर आपल्या शेजारील खुर्चीवर बसवले.

President Ram Nath Kovind forgets protocol, meets friend after 12 years | प्रोटोकॉल बाजूला ठेवून राष्ट्रपतींनी आपल्या मित्राची घेतली गळाभेट!

राष्ट्रपती कोविंद हे ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमधील उत्कल विश्वविद्यालयाच्या प्लॅटिनम जयंती समारंभात सामील होण्यासाठी पोहचले होते. त्यावेळी लोकांमध्ये त्यांना जुने मित्र आणि राज्यसभेचे सदस्य विरभद्र सिंह दिसले.

राष्ट्रपती असूनही आपल्या जुन्या मित्राला पाहताच रामनाथ कोविंद प्रोटोकॉल विसरले आणि कार्यक्रम संपताच त्यांना आपल्या जवळ बोलावले. त्यानंतर दोनीही मित्र एकमेकांना भेटून खूपच आनंदी झाल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर राष्ट्रपतींनी यावेळी आपल्या मित्रांसोबत सेल्फी देखील काढला.

एवढ्या गर्दीत असूनदेखील राष्ट्रपतींनी आपल्याला का इशारा केला यामुळे विरभद्र सिंह यांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर बोलताना सिंह यांनी सांगितले की, 12 वर्षानंतर त्यांची आपल्या या मित्राशी भेट झाली. तसेच ज्यावेळी ते राज्यसभेचे सदस्य होते त्यावेळी कोविंद यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव आला होता असे देखील सांगण्यास विसरले नाहीत. सिंह यांनी सांगितले की, आम्ही दोघेही त्यावेळी एसटी/एससी समितीचे सदस्य होतो आणि आम्ही कमीतकमी दोन वर्ष सोबत काम केलेले आहे.

तसेच सिंह यांनी हे देखील सांगितले की, त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान गुलाब भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु सुरक्षेच्या अभावी त्यांना असे करता आले नाही. तसेच आपल्याला राष्ट्रपती भवनला राष्टपतींनी बोलावल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Visit : Policenama.com