निर्भया केस : दोषी पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी ठरवली रद्द, आता फाशी कधी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवनने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका पाठवली होती. परंतु ही दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून रद्दबातल ठरवण्यात आली आहे. दोषी पवनने फाशी टाळण्याचा अखेरचा मार्ग निवडला होता. सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह याचिका फेटाळल्यानंतर पवनने काही वेळातच राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवली होती. ही याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रद्दबातल ठरवली आहे. याच कारणाने निर्भयाच्या दोषींना 3 मार्चला होणारी टळली होती.

2 मार्चला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयनंतर निर्भयाच्या दोषींचे सर्व कायदेशीर मार्ग बंद झाले होते, यादरम्यान पवनने 2 मार्च राष्ट्रपतींकडे दया याचिकेसाठी अर्ज केला होता. दोषी पवनचे वकील एपी सिंह म्हणाले होते, दुपारी 12 वाजता दया याचिका पाठवली आहे. यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयाने चारही दोषींविरोधात 3 मार्चला डेथ वारंट जारी केले होते. परंतु निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीला तिसऱ्यांदा स्थगिती मिळाली होती.

2 मार्चला पटियाला न्यायालयाच्या निर्णयानंतर फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. पटिलाया हाऊस न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत चारही दोषींची फाशी रोखली आहे. न्यायालयाने दोषींच्या विरोधात काढण्यात आलेल्या डेथ वारंटला स्थगिती दिली. यामुळे दोषींना 3 मार्चला झाली नाही. आता दोषी पवनची दया याचिका राष्ट्रपतीने रद्द केल्यानंतर आता दोषींना कधी फाशी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दोषी पवनचा फाशी टाळण्यासाठी हा अखेरचा मार्ग होता परंतु त्याची दया याचिका राष्ट्रपतींकडून रद्द करण्यात आली.