राष्ट्रपती कोविंद यांचा मोठेपणा ! अमेरिकन मुलीचं भारतीय मुलाशी होणार ‘नियोजित’ लग्न ‘रद्द’ होण्यापासुन वाचवलं

कोच्ची : वृत्तसंस्था – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यामुळे एका परदेशी महिलेच्या लग्नात अडचण होत होती. राष्ट्रपती कार्यालयाला याबाबत माहिती मिळताच कार्यालयानं लग्नात कोणतीही अडचण येऊ नये आणि आरामात लग्न पार पडावं यासाठी निर्देश जारी केले. कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे या महिलेचं एका हॉटेलमध्ये लग्न पार पडणार आहे. राष्ट्रपतींनी त्या हॉटेलमध्ये थांबल्याने तेथे पार पडणाऱ्या लग्नावर कोणताही परिणाम होऊ नये असं राष्ट्रपती कार्यालयाने अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

ताज विवांतामध्ये होणार आहे लग्न

रविवारी महिलेने राष्ट्रपती भवनला ट्विटरवर लग्नाच्या समारंभाबाबत माहिती देत सहाकार्य करण्यासाठी आवाहन केलं होतं. लक्षद्वीप दौऱ्या दरम्यान राष्ट्रपती मंगळवारी एका हॉटेलमध्ये थांबणार असल्याने तेथील अ‍ॅश्ले हॉलमध्ये होणाऱ्या लग्नात अडचण येत होती. काही महिन्यांपूर्वीच महिलेनं हे हॉटेल बुक केलं होतं. परंतु सोमवारी रात्री कोविंद त्या हॉटेलमध्ये मुक्कामी थांबल्याने लग्नात अडचण होणार होती. या महिलेने ट्विट करत राष्ट्रपती भवनला टॅग करत मदत मागितली होती.

यानंतर राष्ट्रपती कार्यालयानं लगेचच पावलं टाकली. अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले की, राष्ट्रपतींच्या सुरक्षेमुळे लग्नात अडचण येता कामा नये. राष्ट्रपतींनी मंगळवारी ताज विवांतामध्ये होणाऱ्या लग्नासाठी महिलेला शुभेच्छा दिल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला अमेरिकेची आहे.

महिलेच्या ट्विटला उत्तर देताना राष्ट्रपती भवनने म्हटलं की, “आम्हाला आनंद आहे की, या मुद्द्याचं समाधान झालं आहे. राष्ट्रपती कोविंद तुम्हाला या शुभप्रसंगी शुभेच्छा देत आहेत.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/