President Ram Nath Kovind To Visit Raigad | राष्ट्रपती रामनाथ कोविंद ‘या’ तारखेला रायगडला देणार भेट

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  President Ram Nath Kovind To Visit Raigad | देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) हे पुढील महिन्यात स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला (Raigad) भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे भोसले (MP Sambhajiraje Bhosale) यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. संभाजीराजेंची विनंती मान्य करुन राष्ट्रपती कोविंद हे येत्या ७ डिसेंबर रोजी रायगडाला भेट देणार आहेत. संभाजीराजे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली. (President Ram Nath Kovind To Visit Raigad)

 

त्यात संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते.
त्यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि़ ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत.
ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.

मराठा आरक्षणांसंबंधीचा प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली होती.
त्यावेळी त्यांनी राष्ट्रपती यांना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते़.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bio Fortified Corn | 250% जास्त प्रोटीन देईल मक्याची नवीन प्रजाती; मांस-अंडे-सप्लीमेंट्सवर राहावे लागणार नाही अवलंबून !

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

WhatsApp चे नवीन फीचर ! द्वेष निर्माण करणारे अन् असभ्य-अश्लिल मेसेज पाठवणार्‍यांनी व्हावे सावध, अन्यथा कायमस्वरूपी बॅन