राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुण्यात आगमन

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुणे येथील लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल  सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.

तसेच  सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे,आर्मीचे लेफ्टनंट जनरल डी. आर.सोनी,विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही राष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.

पुणे येथे बुधवारी (दि. ३०) होणाऱ्या राष्ट्रीय छात्रसेनेचा दीक्षांत संचलन कार्यक्रम, साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन व मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.