दीपा मलिक हिच्यासह 32 खेळाडूंना क्रीडा पुरस्कार, राष्ट्रपती कोविंद यांनी केलं ‘सन्मानित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुरुवारी, राष्ट्रीय क्रीडादिनी (हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवशी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी पॅरा पॅरालंपिक पदक विजेती दीपा मलिक हिला देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले. दीपा व्यतिरिक्त जकार्ता एशियन गेम्स सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू बजरंग यांना हा पुरस्कारही देण्यात आला आहे, पण पुढच्या महिन्यात होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तयारीमुळे तो या समारंभासाठी हजर राहू शकला नाही.

पुढील महिन्यात होणार्‍या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तयारीमुळे या पुरस्कार सोहळ्यातील अनेक खेळाडू या सोहळ्यात सहभागी नव्हते. क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर त्यांना हा सन्मान मिळेल. पुरस्कार सोहळ्यात एकूण सहा खेळाडू उपस्थित नव्हते.

सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मुकंदकाम शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यांच्या समितीने खेलरत्नसाठी दोन, अर्जुन पुरस्कारासाठी १९, द्रोणाचार्य पुरस्कारासाठी ६, तर ध्यानचंद पुरस्कारासाठी ५ जणांची निवड केली. आम्ही याठिकाणी क्रीडापुरस्कार विजेत्यांची यादी देत आहोत.

अर्जुन पुरस्कार :
मोहम्मद अनस (अ‍ॅथलेटिक्स)
एस. भास्करन (बॉडी बिल्डिंग)
सोनिया लाठर (बॉक्सिंग)
चिंगलेन्स्ना सिंग (हॉकी)
अजय ठाकूर (कबड्डी)
गौरव गिल (मोटर स्पोर्ट्स)
प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन)
हरमीत देसाई (टेबल टेनिस)
पूजा ढांडा (कुस्ती)
फुआद मिर्झा (अश्व राईडिंग)
गुरप्रीतसिंग संधू (फुटबॉल)
पूनम यादव (क्रिकेट)
स्वप्ना बर्मन (अ‍ॅथलेटिक्स)
बी. साई प्रणीत (बॅडमिंटन)
सिमरनसिंग शेरगिल (पोलो)
रवींद्र जडेजा (क्रिकेट)
अंजुम मौदगिल (शूटिंग)
ताजिंदर पाल सिंह तोर (अ‍ॅथलेटिक्स)
सुंदरसिंग गुर्जर (पॅरा स्पोर्ट्स-अ‍ॅथलेटिक्स)

द्रोणाचार्य अवॉर्ड :
विमल कुमार (बॅडमिंटन)
संदीप गुप्ता (टेबल टेनिस)

द्रोणाचार्य जीवनगौरव :
मेर्जबान पटेल (हॉकी)
रामबीर सिंह (कबड्डी)
संजय भारद्वाज (क्रिकेट)
मोहिंदरसिंग धिल्लन (अ‍ॅथलेटिक्स)

ध्यानचंद अवॉर्ड :
मॅन्युअल फ्रेडरिक्स (हॉकी)
अरुप बसाक (टेबल टेनिस)
मनोज कुमार (कुस्ती)
नितिन कीर्तिने (लॉन टेनिस)
सी लालरेमसांगा (तीरंदाजी)

आरोग्यविषयक वृत्त –