President Ramnath Kovind | ‘प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्रानेच मुहुर्तमेढ रोवली’; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुण्यात प्रतिपादन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – President Ramnath Kovind | राष्ट्रपती रामनाथ कोंविद (President Ramnath Kovind) पुणे दौ-यावर (Pune) आहेत. येथील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या (Lakshmibai Dagdusheth Halwai Datta Temple) शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. ‘सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक अशा सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रभागी आहे. विविधतेत एकजूट हे महाराष्ट्रानेच देशाला दाखवले आणि महाराष्ट्रच त्यासाठी लढला,” असं राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटले आहे. तसेच, ‘प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्रानेच मुहुर्तमेढ रोवली,’ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

पुण्यातील रौप्यमहोत्सवी कार्यक्रमादरम्यान, सविता कोविंद (Savita Kovind), माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil), राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी Adv. Pratap Pardeshi), कार्यकारी विश्वस्त शिवराज कदम जहागीरदार (Shivraj Kadam Jahagirdar) आदी उपस्थित होते.

प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत केले. मंदिराच्या जिर्णोद्धाराची सुरूवात राष्ट्रपती असताना आपल्या हातून झाली होती याचे स्मरण त्यांनी करून दिले. निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (Dr. Madhuri Kanitkar), डॉ. भाग्यश्री पाटील (Dr. Bhagyashree Patil), डॉ. प्राजक्ता काळे (Dr. Prajakta Kale) यांना ट्रस्टच्या वतीने कोविंद यांच्या हस्ते लक्ष्मीबाई पुरस्कार देण्यात आला.

”गणपती मंदिर, दत्त मंदिर यामुळे पुण्यात एक नवी चेतना मिळते. ही भूमीच महान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम यांनी या भूमीला पावन केले आहे. देशातील मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुले यांनी इथेच सुरू केली. डॉ. आंबेडकरांचे आंदोलन इथूनच सुरू झाले. त्यामुळे महाराष्ट्राची भूमीही थोर आहे. बारा ते तेरा वेळा महाराष्ट्रात आलो. रायगडावर जाऊन शिवछत्रपतींच्या समाधीला वंदन करण्याचे सौभाग्य मिळाले.” असं राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटलं आहे.

Web Title :- President Ramnath Kovind | maharashtra is the only country that has shown unity in diversity president ramnath kovid

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त