आज AIIMS मध्ये होऊ शकते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बायपास सर्जरी; छातीत दुखू लागल्यानंतर झाले रुग्णालयात दाखल

पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आज बायपास सर्जरी होऊ शकते. अलीकडेच त्यांना AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर असे सांगण्यात आले आहे की आज मंगळवारी त्यांची बायपास शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

छातीत दुखू लागल्यानंतर शुक्रवारी राष्ट्रपती कोविंद यांना आर्मी रुग्णालयात दाखल केले गेले. आर्मी रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतीय लष्कराच्या संशोधन आणि संदर्भित रुग्णालयाने निवेदनात म्हंटले आहे की पुढील तपासासाठी त्यांना AIIMS दिल्ली येथे पाठविण्यात आले आहे. २७ मार्च रोजी दुपारी त्यांना AIIMS मध्ये हलविण्यात आले.

त्याच बरोबर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद अस्वस्थ झाल्यानंतर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यात त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आहे. लवकर त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना केली. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने केलेल्या ट्विटनुसार मोदी म्हणाले की ते राष्ट्रपतींच्या मुलाशी बोलले. त्यांच्या तब्बेतीबद्धल माहिती घेतली आणि लवकरात लवकर बरे होण्याचे सांगितले.

३ मार्चला राष्ट्रपतींनी घेतली लस
राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांनी सध्याच कोरोनाची लस घेतली आहे. राष्ट्रपतींनी आर्मी रुग्णालयात लसीचा पहिला डोस घेतला. ते त्यांच्या मुलीसोबत हॉस्पिटलमध्ये गेले. लसीकरण झाल्यानंतर त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे धन्यवाद मानले आणि योग्य व्यक्तींकडून लस घेतल्याचे सांगितले. यासोबत सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाला यशस्वीरीत्या राबविल्याबद्धल त्यांनी सर्व डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी तसेच प्रशासकांचे आभार मानले.