राष्ट्रपती राजवटीची ‘धमकी’ म्हणजे जनादेशाचा ‘अपमान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राष्ट्रपती राजवटीची धमकी देणे म्हणजे हा महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या इशाऱ्यांवर टिका केली.

कोणाचे सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट आणावी लागेल, असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. त्यांच्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला.

राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, राज्यात राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जात आहे. हा जनमताचा अपमान आहे. राष्ट्रपती काय तुमच्या खिशात आहे का असा प्रश्न विचारुन राऊत म्हणाले, राष्ट्रपतींच्या नावाचा वापर करणे हे अतिशय गंभीर आहे. राष्ट्रपतींची प्रतिष्ठा कमी करु नका.

भाजपा सोडून सर्व पक्ष एकमेकांशी बोलत आहेत. आम्ही महायुतीत निवडणुक लढविली होती. युतीधर्माचे पालन शिवसेना अखेरपर्यंत पाळेल, असे सांगत संजय राऊत यांनी चेंडु भाजपाच्या कोर्टात ढकलला आहे.

Visit : Policenama.com