राज्यात राष्ट्रपती राजवट ‘अटळ’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यपालांनी सर्व आमदारांच्या सह्या असलेलं पत्र मागितलं आहे. ही विचित्र अट पूर्ण करणं अवघड आहे. तसेच सत्तास्थापनेसाठी पुरेसा वेळ नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हंटल आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याची शक्‍यता वाढली आहे.

सोमवारी रात्री साडेसातपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी वेळ दिला होता. मात्र काल सकाळपासून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पाठिंबा मिळवण्यासाठी अनेकदा प्रयत्न करुनही त्यांना अपेक्षित यश न मिळाल्याने राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. त्यासाठी 24 तासांचा वेळ देण्यात आला आहे.

सध्या काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये तर वरिष्ठ नेते दिल्लीत असल्यानं चर्चेत अडचणी येत आहेत. वेळेअभावी बैठक कोणत्या ठिकाणी घ्यायची हेदेखील महत्त्वाचे आहे. असे म्हणत सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ कमी असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटले आहे. तसेच सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला शिवसेना , काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीलाही सत्ता स्थापनेचा दावा करणे अवघड असल्याचे चित्र आहे. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रपती लागवट लागू होण्याची शक्‍यता बळकट झाली आहे.

Visit : Policenama.com